Homeताज्या बातम्या

लिंबागणेश येथील पाणंद रस्ता तातडीने खुला करा; तहसीलदारांना ग्रामस्थांचे लेखी निवेदन

बीड: तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्र ते संगीत विद्यालय भाग १ व भाग २ या पाणंद रस्त्याचे काम सुरू असताना मालकीहक

अखेर कामखेडा-कांबी शिवरस्ता खुला; 25 वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गीजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; शेतकर्‍यांसह ग्रामस्थांमध्ये समाधान
स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी-खांडे पारगाव शेतरस्ता; ५० वर्षांचा प्रश्न मार्गी
बीड तहसील कार्यालयात ‘ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्रा’ची सुरुवात; कायदेशीर मदत आणि शासकीय योजना आता एकाच छताखाली

बीड: तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्र ते संगीत विद्यालय भाग १ व भाग २ या पाणंद रस्त्याचे काम सुरू असताना मालकीहक्काच्या जमिनीच्या वादामुळे रस्त्याचे काम अडविण्यात आले आहे. यामुळे परिसरातील शेकडो नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, रस्ता तातडीने खुला करून देण्याची मागणी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

४०० ते ५०० ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांची गैरसोय

या संदर्भात ग्रामस्थांनी परस्पर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरल्यानंतर सरपंच बालासाहेब जाधव, सेवा सोसायटीचे चेअरमन रविबापू निर्मळ, कैलास काटे व डॉ. गणेश ढवळे यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले.

या रस्त्याचा उपयोग जाधव वस्ती, ढवळे वस्ती, घाडगे वस्ती, वाणी वस्ती, कानिटकर वस्ती, कुलकर्णी वस्ती, अंकुशे वस्ती आणि आगवान वस्ती येथील सुमारे ४०० ते ५०० नागरिक करतात. पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून शालेय विद्यार्थ्यांना, रुग्णांना, बाजारहाटासाठी जाणाऱ्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना खत, बियाणे व शेतीसाठी आवश्यक साहित्य ने-आण करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थितीची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्ता खुला करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे केली आहे.

COMMENTS