Homeताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तख्त श्री हजूर साहिबकडून विशेष सत्कार

नांदेड: साहिब श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दीनिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यातील विविध शहरांमध्ये आयोजित केलेल्या ऐत

सदाभाऊ खोतांनी आंदोलनकर्त्यांना “आतंकवादी” संबोधल्यावरून वादंग; विरोधकांची टीका, बच्चू कडूंकडूनही विधान मागे घेण्याचा सल्ला
अल्पसंख्याक संरक्षण कायद्याच्या मागणीला मोठे यश; उपमुख्यमंत्री सुमित्राताई अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित
अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले; मध्यपूर्वेत वाढला तणाव

नांदेड: साहिब श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दीनिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यातील विविध शहरांमध्ये आयोजित केलेल्या ऐतिहासिक गुरमत समागमांच्या यशस्वी आयोजनाबद्दल तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिबचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (आय.ए.एस., निवृत्त) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.

मुंबई येथील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीत डॉ. विजय सतबीर सिंघ आणि सरदार जसवंत सिंघ बॉबी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाने शीख समाजासाठी केलेल्या अभूतपूर्व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्र्यांना सिरोपाव व प्रसाद देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी डॉ. विजय सतबीर सिंघ यांनी सांगितले की, नागपूर, नवी मुंबई आणि श्री हजूर साहिब (नांदेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या गुरमत समागमांना देश-विदेशातील लाखो भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः सचखंड श्री हजूर साहिब येथे झालेल्या दोन दिवसीय महान कीर्तन दरबारात मोठ्या संख्येने संगत सहभागी झाली होती.

महाराष्ट्र शासनाने नेहमीच गुरु घर आणि संगताप्रती आदराची भावना जपली आहे. लंगर, निवास, वैद्यकीय सुविधा, सुरक्षा आणि इतर सर्व आवश्यक व्यवस्थांसाठी प्रशासनाने केलेले नियोजन व परिश्रम अत्यंत कौतुकास्पद असून, या यशामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व आणि वैयक्तिक लक्ष महत्त्वाचे ठरले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच समागमात सहभागी झालेल्या सर्व संत-महापुरुषांचेही त्यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तख्त श्री हजूर साहिबच्या प्रशासकांचे आभार मानत, भविष्यातही शीख समाज आणि संगताच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासन कायम तत्पर राहील, अशी ग्वाही दिली.

COMMENTS