श्रीरामपूर: इनरव्हील क्लब श्रीरामपूर यांच्या वतीने बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल, मुठेवाडगाव येथील ५० आर्थिकदृष्ट्या मागास व गरज

श्रीरामपूर: इनरव्हील क्लब श्रीरामपूर यांच्या वतीने बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल, मुठेवाडगाव येथील ५० आर्थिकदृष्ट्या मागास व गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे मोफत वितरण करण्यात आले. शैक्षणिक वाटचालीस मदत मिळावी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
हा कार्यक्रम इनरव्हील क्लब श्रीरामपूरच्या अध्यक्षा राखी बिहानी यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव डॉ. रितू लखोटिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी क्लबच्या उपाध्यक्षा सुप्रिया भोसले, पद्मा भूतडा, प्रतिभा शिंदे आणि निशा खटोड यांची विशेष उपस्थिती लाभली.
या वेळी बोलताना अध्यक्षा राखी बिहानी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “जीवनात कितीही मोठे यश संपादन केले, तरी आपल्याला लहानाचे मोठे करणाऱ्या आई-वडिलांना आयुष्यात कधीच विसरू नका.”
तसेच क्लबच्या उपाध्यक्षा सुप्रिया भोसले यांनी भविष्यात बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल मुठेवाडगाव ही शाळा दत्तक घेऊन येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर वृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाबद्दल आणि शाळा दत्तक घेण्याच्या दिलेल्या आश्वासनाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंदातर्फे इनरव्हील क्लब श्रीरामपूरचे मनापासून आभार मानण्यात आले.

COMMENTS