Homeताज्या बातम्या

हरिश्चंद्र गडावर दरड कोसळली; मालाडचे चार पर्यटक गंभीर जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

अकोले: हरिश्चंद्र गडावर रविवारी सुट्टीमुळे पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. पावसाची झिमझिम सुरू असताना मालाड येथील दहा पर्यटक हरिश्चंद्रगडावरून ख

मिनी बस दरीत कोसळून दोन पर्यटकांचा मृत्यू; राजगड परिसरातील पाबे घाटातील भीषण अपघात
पाडळी भिल्ल वस्तीतील २० मुलांना शिक्षणाची नवी दिशा; एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा स्तुत्य उपक्रम
गौतम खंडागळे ‘अष्टपैलू समाजभूषण’ तर एम.एम.शेख ‘कला-साहित्य व समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित; सा. युवा लोकमित्र सोहळ्यात अभिनंदनाचा वर्षाव
Landslide : हरिश्चंद्रगडावर दरड कोसळली; चार पर्यटक गंभीर जखमी, तिघांची  प्रकृती चिंताजनक – Prahaar.in

अकोले: हरिश्चंद्र गडावर रविवारी सुट्टीमुळे पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. पावसाची झिमझिम सुरू असताना मालाड येथील दहा पर्यटक हरिश्चंद्रगडावरून खाली उतरत होते. यावेळी आडव्या कड्याच्या मागील बाजूस पर्यटकांच्या अंगावर अचानक दगड व मातीची दरड कोसळली. या दुर्घटनेत चार पर्यटक गंभीररित्या जखमी झाले असून, दोन पर्यटक माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. पर्यटकांच्या संरक्षणासाठी बांधलेल्या रेलिंगमुळे सुदैवाने पर्यटकांना मोठा आधार मिळाला.

घटनेची माहिती सोबत असलेल्या पर्यटकांनी व तेथील ग्रामस्थ अमोल बादड यांनी तात्काळ गावात व वन्यजीव विभागाला दिली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पर्यटकांच्या मदतीने ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढले. त्यांना तातडीने गडाच्या पायथ्याशी आणून खाजगी वाहनाने राजूर रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. दरम्यान, रस्त्यात १०८ ॲम्ब्युलन्स मिळाल्याने जखमींना तातडीने राजूर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात डॉ. अभिनव लहामटे यांनी प्रथमोपचार करून जखमींना अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्याचा सल्ला दिला. जखमींमध्ये राम प्रकाश यादव, निलेश गोमाटी विश्वकर्मा, कृष्णा कुमार साहू आणि दिनेश संजय साहू यांचा समावेश असून, यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेचे वृत्त समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, वनक्षेत्रपाल दत्तात्रय पडवळे व लांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य राबवले आणि जखमींना नाशिक येथे हलवण्याची व्यवस्था केली.

COMMENTS