Homeताज्या बातम्या

भाजी विक्रेत्या महिलेचा विनयभंग

अहिल्यानगर  :  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रात्रीच्या वेळी भाजीपाला विक्री करणार्‍या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
शेवगाव पोलिसांचा मोठा दणका! सालवडगाव शिवारात अवैध ‘सुपारी मावा’ कारखान्यावर छापा
सासरच्या छळाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या! हुंड्यासाठी छळ अन् विहिरीत उडी घेऊन शेवट
Crime News : भाजी विक्रेत्या महिलेचा विनयभंग - Deshdoot

अहिल्यानगर  :  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रात्रीच्या वेळी भाजीपाला विक्री करणार्‍या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोपाल चौधरी (रा. मल्हार चौक, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घडली.

  फिर्यादी महिला नेहमीप्रमाणे भाजीपाला विक्री करत असताना आरोपी त्याच्या ताब्यातील मोटारसायकलवरून तेथे आला. त्याने महिलेशी अयोग्य पद्धतीने बोलत, तू किती पैसे घेतेस, तू माझ्यासोबत चल, असे म्हणत अश्लील स्वरूपाचे उद्गार काढल्याचा आरोप आहे. फिर्यादीने त्याला त्याचे नाव विचारून अशा प्रकारे का बोलत असल्याचा जाब विचारला असता, आरोपीने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर तिची साडी ओढून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस नाईक वर्षा पंडीत या करत आहेत.

COMMENTS