Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार

मुंबई प्रतिनिधी - मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राज

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी
मोदी सरकारच फक्त निवडणुकी कडेच लक्ष असत
नियोजनाचा अभाव

मुंबई प्रतिनिधी – मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यामुळे मनोज जरांगेंविरोधात सत्ताधाऱ्यांनी भूमिका घेतली आहे. मनोज जरांगेंना कोणाचं पाठबळ आहे, याची चौकशी करा, अशा मागणीला जोर धरला होता. आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा नेते आशिष शेलार यांनी हा विषय सभागृहात उपस्थित केला. यावरून सभागृहात प्रचंड खडाजंगी झाली. महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडण्यासाठी कट रचला जातोय, अशी परिस्थिती आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेविरोधात या सदनात नाही बोलणार तर कुठे बोलणार?” असा प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केला.“महाराष्ट्र बेचिराख करायची भाषा कोणी करत असेल तर त्या भूमिकेविरोधात विरोधक उभे राहतील, असा आमचा विश्वास आहे. महाराष्ट्र बेचिराख करण्याची केवळ धमकी आहे का? यामागची भूमिका काय? त्यासाठी कटकारस्थान-योजना केली आहे का? याबाबत गांभर्याने विचार करावा लागेल. कारण, आता मराठा समाजाचीही बदनामी होतेय”, असंही ते म्हणाले .आशिष शेलारांच्या या निवेदनानंतर विरोधी पक्षानेही भूमिका मांडली. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सत्ताधाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, सभागृहात गोंधळ वाढू लागल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज तहकूब केलं. कामकाज सुरळीत सुरू झाल्यानंतर या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा करण्यात आली

COMMENTS