Homeताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह माता रमाईंचा आदरपूर्व उल्लेख व्हावा; राहुल वडमारे यांची सामाजिक न्याय विभागाकडे मागणी

मुंबई : भीम संग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल शिवाजी वडमारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाला नि

रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार; बीडच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरवादी समाज आक्रमक; ३० जूनला मुंबईत विधानसभेला घालणार घेराव
बीडचा लाँग मार्च पुणे जिल्ह्यात दाखलउपवर्गीकरण रद्दच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच

मुंबई : भीम संग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल शिवाजी वडमारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाला निवेदन देत सरकारी कामकाजासह सर्व सार्वजनिक व्यवहारांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा उल्लेख एकेरी भाषेत न करता आदरपूर्वक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख महामानव विश्‍वरत्न बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई यांचा उल्लेख त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर असा करावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण, भारतीय राज्यघटना निर्मितीतील योगदान, अर्थतज्ज्ञ म्हणून असलेली ओळख आणि जागतिक स्तरावरील कार्याचा उल्लेख करून त्यांच्या सन्मानास साजेसा उल्लेख सर्व शासकीय कागदपत्रे व अधिकृत संवादामध्ये करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात महाराष्ट्र संपर्कप्रमुख आनंद साळवे, प्रदेश महासचिव कैलास परदेशी आणि पुणे जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण यांचा समावेश होता.

COMMENTS