पुणे : पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या

पुणे : पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीने (ई-बाईक) अचानक पेट घेतल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या घटनेत अग्निशमन दलाने तत्परता दाखवत इमारतीत अडकलेल्या दोन जणांची सुखरूप सुटका केली आहे. अग्निशमन दलाच्या जनसंपर्क अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरातील एका निवासी इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंग भागात ही घटना घडली.

COMMENTS