Homeताज्या बातम्या

देशात संविधान  उरले नाही : खा. राऊत

 मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांच्या गटाला लोकसभा सचिवालय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित सहा खासदारांचे शिंदे गटात झालेले विलीनीकरण अधिकृतपणे मान्य झाले आहे.या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आणि न्यायव्यवस्थेवर तीव्र टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या आमदारांच्या प्रकरणावर वेळेत निर्णय दिला असता, तर वारंवार पक्षफोडीच्या घटना घडल्या नसत्या, असा दावा त्यांनी केला.संजय राऊत म्हणाले की,  सर्वोच्च न्यायालयाने 40 आमदारांच्या आमच्या प्रलंबित प्रकरणाचा निकाल दिला असता, तर वारंवार देशात पक्ष फोडले गेले नसते. देशात लोकशाहीची  हत्या होत आहे. संविधान कुठे उरले आहे? दहाव्या परिशिष्टात कुठल्याही पक्षफुटीला किंवा विलीनीकरणाला मान्यता नाही. मग लोकसभा अध्यक्षांनी 6 फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता कशी दिली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधताना राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे म्हणजे आचार्य विनोबा भावे नाहीत. दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे, तर ते आचार्य विनोबा भावे नाहीत. ते बोलतील ते सत्य आहे आणि नीतिमत्तेचे आहे असे नाही. ते मशालीवर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50 कोटींना विकत घेतले. मशाल चिन्हावर निवडून आलेले लोक निर्लज्ज आणि गद्दार आहेत. ते चांगले की वाईट हे सोडून द्या, हे गद्दार आहेत. संजय राऊत पुढे म्हणाले की, “तुम्ही काय आम्हाला सांगत आहात? एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल, हे लक्षात घ्या. दाढीवरती हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका. तुमची जी नीतिमत्ता आहे, ती अमित शाह यांच्या पायापाशी गहाण पडली आहे अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान मोदींचा १२ वर्षांचा कार्यकाळ ही केवळ सुरुवात, आगामी अनेक वर्षे देशात भाजप आणि एनडीएचेच शासन राहील – अमित शाह
पवनराजे हत्याकांडप्रकरणी सीबीआय हायकोर्टात जाणारउपमुख्यमंत्री शिंदेंनी केली गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडून महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी तब्बल ३,००० कोटी रुपयांच्या दोन भव्य प्रकल्पांची घोषणा!
संजय राउत: प्रधानमंत्री की 'मैं खुद नहीं खाऊंगा, मैं किसी को नहीं खाने दूंगा' वाली नीति महाराष्ट्र में लागू नहीं होती; क्या अब बच्चों के खेल ...

COMMENTS