Homeताज्या बातम्या

कोल्हार खुर्द येथे अपघात; एक मृत्यू

देवळाली प्रवरा:  राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे  झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मद्यधुंद ट्रक चालकाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील साई मंदिरासमोर रविवारी हा भीषण अपघात घडला.नरसळी, बेलापूर येथील ज्योती भाऊराव माळी या आपल्या मुलगा अक्षय माळी यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत होत्या. यावेळी राहुरीकडून शिर्डीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता. धडक इतकी भीषण होती की ज्योती माळी या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक अक्षय माळी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जीवनदायी रुग्णवाहिकेचे चालक निखिल भोसले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कोल्हार खुर्द व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टाकीत उतरलेल्या चार सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू
विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये क्रेनची बकेट निसटून १६००°C तापमानाचे वितळलेले लोह अंगावर पडल्याने ८ कामगारांचा जागीच मृत्यू!
तळोजामध्ये कारने दिली 10 जणांना धडकदोघांचा मृत्यू; 8 जण जखमी, चालक घटनास्थळावरून पसार

COMMENTS