Homeताज्या बातम्या

एकही बंजारा तांडा विकासापासून वंचित राहणार नाही – अमरसिंह पंडित46 लक्ष रुपये किंमतीच्या पोईतांडा तांडा येथे विविध विकास कामांचे भव्य शुभारंभ

विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाने शिवछत्र परिवाराला साथ दिली, प्रचाराच्या काळात आम्ही विकासकामांचा शब्द दिला होता, तो पूर्ण करण्याचे काम आता सुरु

सौर ऊर्जा, जलसंधारणातील कामांची दखल; तिगावच्या सरपंच अर्चना राज पाटील यांना लोकमत सरपंच अवॉर्ड 2026
अकोलेत कुपोषणाचे सावट गडद;३८ तीव्र कुपोषित, ३३८ मध्यम कुपोषित बालके; अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर नियुक्तीची गरज
घोडेगाव परिसरात पोषण पंधरवडा उत्साहात 



विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाने शिवछत्र परिवाराला साथ दिली, प्रचाराच्या काळात आम्ही विकासकामांचा शब्द दिला होता, तो पूर्ण करण्याचे काम आता सुरु झाले असून सभामंडप, अंगणवाडी, शाळा बांधकाम, रस्ते, विज, पाणी अशा मुलभूत सुविधांसंदर्भातील विकासकामे सध्या अनेक तांड्यांवर सुरु आहेत. तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायती मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघातील कोणताही बंजारा तांडा विकासापासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. पोईतांड्याला ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी,शाळा खोली 46लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकास कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अंगणवाडी , ग्रामपंचायत भवन,शाळा खोली या 46लक्ष रुपये किंमतीच्या ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी,शाळा खोली बांधकाम मजबुतीकरण करणे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे व्ही.जे.एन.टी.सेल अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, डॉ . आसाराम मराठे जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणपत नाटकर,माजी सरपंच विष्णु हात्ते,माजी उपसरपंच आक्रम सौदागर, बळीराजा शुगर चे अरुण काका चाळक,माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश महाराज कचरे, इंजिनिअर कल्याण हात्ते, बाजार समितीचे संचालक बाबुराव जाधव, माजी सरपंच किरण वावरे,रवि मरकड, अरुण डोंगरे,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी ठिकठिकाणी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे ग्रामस्थांनी भव्य स्वागत केले. अमरसिंह पंडित यांनी बंजारा समाजातील महिला व नागरिकांशी सुसंवाद साधला. विविध विकासकामांचे काम दर्जेदार करण्यात येतील त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी  केले. यावेळी विठ्ठल चव्हाण, सतिश चव्हाण, अशोक चव्हाण, मगन चव्हाण, राहुल पवार, अंकुश पवार लखन पवार, गणेश जाधव ,डि.के.पवार, कैलास चव्हाण, गोपीनाथ चव्हाण, भिमराव चव्हाण,प्रल्हाद चव्हाण, पांडुरंग चव्हाण, तुकाराम चव्हाण,शंकर राठोड, विकास राठोड, बन्सी चव्हाण ,नंदकिशोरचव्हाण,यांच्यासह आनंदवाडी, चाहुरतांडा, पवार मळा,देवितांडा,पोईतांडा येथील नागरिक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व सुत्रसंचलन एल.जी.जाधव व आभार प्रदर्शन पत्रकार विष्णु राठोड यांनी केले यांच्या सह बंजारा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS