Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडार समाजाचा प्रश्‍न सोमवारी विधिमंडळात मांडणार : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

सातारा : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासमोर कैफियत मांडताना नलवडे अण्णा शेजारी कार्यकर्ते. सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्

नागरिकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांचा लाभ घ्यावा : मंगला धोटे
सुंदरगडावर श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते शस्त्र पूजन
महावितरणच्या प्रादेशिक नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘सवाल अंधाराचा’ सर्वोत्कृष्ट; कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ द्वितीय

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील खाणपट्टे 15 पैकी 4 वडार समाजास मिळणे गरजेचे आहे. येत्या सोमवारी विधिमंडळात प्रलंबित प्रश्‍न मांडून न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहु, असे आश्‍वासन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेतर्फे आंदोलन सुरू आहे. त्याठिकाणी दरेकर यांनी भेट देऊन वडार समाजाच्या मागण्यासंदर्भात कार्यकर्त्याबरोबर सविस्तर चर्चा-विनिमय केल्यानंतर त्यांनी आश्‍वासन दिले.
प्रवीण दरेकर म्हणाले, केवळ मी वडार समाजाच्या कार्यकर्त्यामुळे घडलो आहे. त्यांनीच मुंबईत मला मोठे केले आहे. 100 टक्के वडार समाज कष्टकरी आहेत. त्यामुळे त्यांच्या न्याय हक्कासाठी जो लढा आहे. त्यास आक्रमकपणे आपण मुंबईत गेल्यानंतर सोमवारी सत्ताधारी यांना जाब विचारणार असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.
जिल्ह्यातील दीड वर्षांपासून खाणकाम बंद आहे. फक्त सातार्‍यातच कोणाच्या तरी आशीर्वादाने चालू आहे? असा आक्रमक पवित्रा घेत जिल्ह्याध्यक्ष नलवडे अण्णा यांनी दरेकर यांच्यासमोर मांडून त्याचा शोध लागला पाहिजे, अशीही मागणी केली आहे.
तात्पुरते परवाने शासनाच्या सुधारीत मंत्रिमंडळ व शासन निर्णयाप्रमाणे पारंपरिक वडार समाजातील व्यक्तींना व्यवसायासाठी प्राधान्याने मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र नलवडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात, जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. त्यांनी हायकोर्टाच्या निर्णयानुसार निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगितल्याने चर्चा निष्फळ झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे. न्यायासाठी हाय कोर्टात अपीलही करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नलवडे अण्णा यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील नागेवाडी सर्व्हे नं. 308 मधील लिलाव प्रक्रियेमध्ये वडार समाजाकरिता एकूण 15 प्लॉट पैकी 4 प्लॉट राखीव ठेवलेले आहेत. 2 प्लॉट परमिटसाठी ठेवलेले असून 4 ही प्लॉट सलग एकाच ठिकाणी वडार समाजासाठीच राखीव ठेवून त्याचा लिलाव अन्य कोणालाही देवू नये. या प्रमुख मागणीसाठी कार्यकर्त्यांनी उपोषण-आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनास वडार समाजाच्या संघटना यांच्यसह नाभिक संघटना, संविधान लोकजागर परिषद, शिक्षक परिषद, राष्ट्रोत्सव संयोजन समिती, राष्ट्रवादी, भाजपा, धम्म बांधव कमिटी आदींनी भेटी देऊन जाहीर पाठींबा दर्शविला आहे.
यावेळी रेश्मा चौगुले, सविता मोहिते, कमल पवार, शिवाजी पवार, राजू पवार, ओमकार माने, मुकुंद पवार, संजय गुरव, अनिल वीर, दीपक नलवडे, राजेंद्र गायकवाड, मनोज पवार, अजय जाधव, लक्ष्मण अलंकुटे, अनिल पवार, सौरभ चौगुले, विलास पवार, बाळकृष्ण महाडिक, मच्िंछद्र जाधव, राजू पिसाळ आदी शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

COMMENTS