माजलगाव नगर परिषदेतील कथित गैरव्यवहार, बनावट कागदपत्रे, खोट्या स्वाक्षर्या आणि अभिलेखांमध्ये फेरफार केल्याच्या आरोपांबाबत रिपब्लिकन पक्षाच्या वत

माजलगाव नगर परिषदेतील कथित गैरव्यवहार, बनावट कागदपत्रे, खोट्या स्वाक्षर्या आणि अभिलेखांमध्ये फेरफार केल्याच्या आरोपांबाबत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नगर परिषदेतील लिपिक शिवहर शेटे, विघ्नेश मुंडे आणि अक्षय धारक यांच्यावर गुंठेवारी व मालमत्ता प्रकरणांमध्ये बनावट आदेश तयार करणे, खोट्या स्वाक्षर्या करून प्रमाणपत्रे देणे, अभिलेखांमध्ये फेरफार करणे तसेच विविध नोंदींमध्ये खाडाखोड केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे शासनाची दिशाभूल झाली असून नागरिकांचीही फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच पी.टी.आर., गुंठेवारी, मालमत्ता नोंदी आणि इतर शासकीय अभिलेखांमध्येही नियमबाह्य बदल केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करावेत, शासनाचे झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करावे तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, निवेदनातील . या प्रकरणातील आरोपांची सत्यता सक्षम यंत्रणेकडून होणार्या चौकशीनंतरच स्पष्ट होईल मात्र या निवेदनामुळे माजलगाव नगर परिषदेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून शासन या प्रकरणात कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच या दोषीवर कारवाई नाही झाल्यास पीपल्स पार्टीचे तालुकाध्यक्ष राकेश साळवे, विधानसभा अध्यक्ष सिद्धार्थ ससाणे,सह कार्यकर्ते लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

COMMENTS