Homeताज्या बातम्या

प्रशासकीय ढिसाळपणावर आमदारांचा थेट प्रहारजनतेची गैरसोय आता खपवून घेतली जाणार नाही!

लोकशाहीत प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी असते, पण जेव्हा हेच प्रशासन सुस्तावते, तेव्हा सर्वसामान्यांचे जीणे असह्य होते. किनवट-माहूर विधानसभा मतदारसं

गुरुद्वारा सचखंड बोर्डाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विकासकामांचे उद्घाटनडॉ. विजय सतबीरसिंघ यांची माहिती
नेकनूर येथील स्त्री रुग्णालयात अखेर सोनोग्राफी मशीन उपलब्धसचिन शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
24 कोटींच्या ’माता व बाल’ रुग्णालयात अवघ्या 10 दिवसांतच वॉटर फिल्टर बंद!गळती, लिफ्ट बिघाडानंतर आता पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न; व्यवस्थेवर डॉ. गणेश ढवळे यांचा सवाल



लोकशाहीत प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी असते, पण जेव्हा हेच प्रशासन सुस्तावते, तेव्हा सर्वसामान्यांचे जीणे असह्य होते. किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील याच जळजळीत वास्तवावर बोट ठेवत आमदार भीमराव केराम यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. सामान्य नागरिकांची कोणतीही गैरसोय खपवून घेतली जाणार नाही, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा कडक शब्दांत त्यांनी अधिकार्‍यांचे कान टोचले आहेत.
वीज, रस्ते, पाणी आणि आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र, मतदारसंघात अनेक ठिकाणी या सुविधांची वानवा असल्याने जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांनी घेतलेली आक्रमक भूमिका प्रशासनाला जाग आणणारी ठरेल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.  दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना साध्या साध्या कामांसाठी किंवा शासकीय योजनांच्या लाभासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. आमदारांनी यावर थेट आक्षेप घेत अधिकार्‍यांना जबाबदारीने काम करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ आश्वासने नको तर लोकाभिमुख भूमिका घेऊन प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशी स्पष्ट तंबी देण्यात आली आहे. प्रशासनाने जर या इशार्‍याकडे दुर्लक्ष केले, तर होणार्‍या गंभीर परिणामांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असे सांगून आमदारांनी अधिकार्‍यांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेचा आवाज बनून प्रशासनाला धारेवर धरले आहे. आता गरज आहे ती प्रशासनाने या इशार्‍याची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष कृती करण्याची, जेणेकरून किनवट-माहूरमधील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचू शकेल.

COMMENTS