Homeताज्या बातम्या

साकुरीत फरसाणच्या कारखान्याला भीषण आग

राहाता : तालुक्यातील साकुरी शहरातील उपासणी नगर परिसरात भीषण अग्नितांडव घडले. लुटे यांच्या मालकीच्या फरसाण बनविण्याच्या कारखान्याला अचानक लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारखान्यातील यंत्रसामग्री, तयार माल, कच्चा माल तसेच इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.आग लागल्यानंतर काही क्षणांतच धुराचे प्रचंड लोट आणि आगीच्या उंच ज्वाळा परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिसरातील नागरिकांनी तात्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा आल्या.घटनेची माहिती मिळताच राहाता नगरपरिषदेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दल वेळेत पोहोचल्यामुळे आग शेजारील घरे व इतर आस्थापनांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिस व स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा अंतिम पंचनामा संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत असून, प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या दुर्घटनेमुळे साकुरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने अशा औद्योगिक आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची आवश्यकता असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

तामिळनाडूत फटाका कारखान्यात भीषण स्फोटात 16 कामगारांचा मृत्यू
दिल्लीत आगीच्या ज्वाळांपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने केला विजेच्या तारांवरून थरारक प्रवास
गॅस सिलिंडरच्या स्फोटात महिलेचा मृत्यूछत्रपती संभाजीनगरातील घटना ; नऊ जणांचा वाचले प्राण

COMMENTS