Homeताज्या बातम्या

मुंबईत पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांचा ’स्वाभिमान लेखणी’ पुरस्काराने गौरव

जनहिताच्या प्रश्नांवर निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि सातत्यपूर्ण वृत्तांकन करणारे ’टाईम्स न्यूज 24’ या वृत्तपोर्टलचे संपादक तथा पत्रकार किशोरकुमार शिवाज

शिवमहापुराण सप्ताहाची महाप्रसादाने उत्साहात सांगताशिवमहापुराण श्रवणाने पापांचा परिहार; गोदावरी तीरावर कथा ऐकण्याचे विशेष महत्त्व – शिवम शुक्ल महाराज
संगमनेर ब्रँड बदनाम करण्याचा डाव : दुर्गा तांबे 
सरसकट कर्जमाफीसाठी मंगळवारी पारनेर तहसीलवर मोर्चाखा. लंके यांच्या उपस्थितीत बैठक ; शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग



जनहिताच्या प्रश्नांवर निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि सातत्यपूर्ण वृत्तांकन करणारे ’टाईम्स न्यूज 24’ या वृत्तपोर्टलचे संपादक तथा पत्रकार किशोरकुमार शिवाजीराव वागदरीकर यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ’स्वाभिमान लेखणी’ पुरस्काराने रविवारी (12 जुलै) मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.
आर्यारवी एंटरटेनमेंट यांच्या वतीने आयोजित ’पहिला पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य, समाजसेवक पुरस्कार सोहळा-2026’ या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉल येथे झालेल्या या सोहळ्यात आयोजक, लेखक, अभिनेते, दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या हस्ते वागदरीकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी श्रीधर कीर, विसुभाऊ बापट, अरुण म्हात्रे, पंढरीनाथ तामोरे, गुरुनाथ तिरपनकर, सुनील शिर्के, वैभव कदम, कृष्णा काजरोळकर, ड. गौरव पाटील आणि अतुल तोडकरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. पत्रकारितेत निर्भीड, निष्पक्ष आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने प्रभावी वृत्तांकन केल्याबद्दल वागदरीकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. डिजिटल माध्यमाच्या प्रभावी वापरातून सामाजिक, प्रशासकीय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत त्यांनी विश्वासार्ह पत्रकार म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ’टाईम्स न्यूज 24’ या वृत्तपोर्टल आणि युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ते विविध लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने वृत्तांकन करत असून, त्यांच्या बातम्यांची दखल प्रशासनासह समाजातील विविध स्तरांवर घेतली जाते. यापूर्वीही त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत विविध प्रतिष्ठित संस्थांकडून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ’स्वाभिमान लेखणी’ पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला आणखी एक मानाचा सन्मान लाभला असून, नांदेडच्या पत्रकारितेच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल पत्रकार, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS