Homeताज्या बातम्यामनोरंजन

तमन्नाचा १८ वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल

आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय चालू आहे. किंवा त्यांच्या आयुष्यात पूर्वी काय घडून गेले आहे. याबाबी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक

तमन्ना भाटीयाने अफेअरच्या चर्चांना दिला पूर्णविराम, विजयसोबतच्या प्रेमाची दिली कबुली
‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच घेणार सात फेरे;
तमन्ना भाटिया लवकरच विजय वर्मासोबत करणार लग्न ?

आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय चालू आहे. किंवा त्यांच्या आयुष्यात पूर्वी काय घडून गेले आहे. याबाबी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. कलाकारांचे लूक त्यांचे चाहते नेहमीच फॉलो करत असतात. त्यामुळे अशातच जर त्यांना त्यांचा जुना लूक पाहायला मिळाला तर ते देखील आश्चर्यचकित होतात.प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाने २००५ मध्ये अभिजीत सावंतच्या ‘लफ्जो में’ या म्युझिक अल्बममधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण हा तिचा पहिला प्रोजेक्ट नव्हता.. कारण ती तेरा वर्षांची तिला तिचा पहिला चित्रपट मिळाला होता. तिचा पहिला चित्रपट पूर्ण झाला तेव्हा ती दहावीत होती. तमन्ना भाटियाने स्वतः एका ऑडिशनमध्ये हे सांगितले होते. आता इंटरनेटवर अभिनेत्रीचा ती १८ वर्षांची असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यातील तिचा लूक पाहून सर्वचजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. तमन्ना भाटियाचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती कोणत्या इयत्तेत आहे आणि तिचे या इंडस्ट्रीत पदार्पण कसे झाले याबद्दल सांगत आहे. अभिनेत्रीचा हा तिच्या वयाच्या १८ व्या वर्षीचा लूक पाहून चाहते थक्क झाले. काहींचे म्हणणे आहे की तमन्ना आजही बदललेली नाही तर काहीजण म्हणत आहेत की ती व्हिडिओमध्ये अजिबात किशोरवयीन दिसत नाही.तमन्ना भाटिया व्हिडिओमध्ये काय म्हणाली ? व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तमन्ना म्हणतेय की, ‘मी जेव्हा हा सिनेमा साइन केला तेव्हा मी १३.५ वर्षांची होते. मी आता शाळेत आहे. २००५ मध्ये माझी १० वी पूर्ण होईल. सध्या माझा अभ्यासही चालू आहे. तमन्ना भाटियाचा १८ वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल तमन्ना भाटिया १८ वर्षांची असतानाचा तिचा हा लूक पाहून चाहत्यांनी कमेंट करायला सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले की, ‘ती गंमत करत आहे. तेव्हा ती दहावीत शिकत होती असे वाटत नाही. तर एकाने लिहिले, ‘वयाच्या १५ व्या वर्षी इतका मॅच्युर आवाज.’ व्वा’. लोकांनी तमन्ना भाटियाच्या वयावर प्रश्न उपस्थित केले

COMMENTS