Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोगस जात प्रमाणपत्र आधारे नोकरी मिळवणा-या कर्मचा-यास जिल्हा रुग्णालय पाठीशी 

नाशिक प्रतिनिधी - बोगस जात प्रमाणपत्र आधारे नोकरी मिळवणा-या कर्मचा-यास जिल्हा रुग्णालय पाठीशी घालत असल्याने  प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने आंद

चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ
जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या आणि अडाणी समुहाच्या विरोधात आंदोलन
पोलिस उपनिरीक्षकावरच थेट ब्लेडने हल्ला

नाशिक प्रतिनिधी – बोगस जात प्रमाणपत्र आधारे नोकरी मिळवणा-या कर्मचा-यास जिल्हा रुग्णालय पाठीशी घालत असल्याने  प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात आले, नाशिक जिल्हा रुग्णालयात बोगस जात प्रमाणपत्र आधारे नोकरी मिळवून जिल्हा रुग्णालयाची फसवणूक करणाऱ्या मिलिंद पवार या कर्मचाऱ्यांस तत्काळ निलंबित करण्यात येऊन या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी  यांचे वर कारवाई करण्यात यावे या साठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनिल भडांगे यांनी अनेक दिवसांपासून जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे लेखी पत्र व्यवहार करुन पाठपुरावा केला होता, परंतु कोणतीही दाद मिळत नसल्याने जिल्हा रुग्णालय येथे पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात आले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन जिल्हाध्यक्ष आनिल भडांगे यांच्या शी चर्चा केली जिल्हा रुग्णालय प्रशासनाने जात पडताळणी विभागा कडे पत्र व्यवहार  केला आहे जात प्रमाणपत्र अहवाल मध्ये चुकीचे जात प्रमाणपत्र आढळल्यास तत्काळ संबंधित कर्मचारी स निलंबित केले जाईल असे आश्वासन डॉ. शिंदे यांनी आंदोलन कर्त्या ना दिले, अमरनाथ यात्रेकरूंना तपासणी न करता वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या चौकशी साठी समिती नेमली असुन अद्याप कारवाई झाली नसल्याचे भंडागे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांचे निदर्शनास आणून दिले

या प्रसंगी उपस्थित होते जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, जिल्हा सरचिटणीस नितीन गवळी, शहर सरचिटणीस प्रमोद केदारे, चिटणीस संजय तिवडे, जिल्हा संघटक दिलीप पाटील, त्रंबकेश्वर तालुकाध्यक्ष नाना दोंदे, उप तालुकाध्यक्ष अनंता उपाध्ये, शहानवाज शेख, दिव्यांग जिल्हाप्रमुख ललित पवार, कार्याध्यक्ष बबलू मिर्झा, उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी, उप शहराध्यक्ष बाबुराव जाधव, प्रभाकर साळुंखे, अमोल जगताप, रुबल पाटील, गणेश कालेवार, अमोल शिंदे आदी उपस्थित होते.

COMMENTS