Homeताज्या बातम्या

हाजी शेख अहेमद बाबन यांचे वृद्धापकाळाने निधनबालेपीर दरगाह कब्रस्तान येथे दफनविधी

बीड : जिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचारी हाजी शेख अहेमद बाबन यांचे दिनांक 11 जुलै 2026 शनिवार रोजी रात्री 08:00 वाजेच्या सुमारास वयाच्या 86

महालनबाई शिंदे यांचे निधन
महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरणजम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट
योगेश फुलशंकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधनअर्जुन फुलशंकर यांना पुत्रशोक


बीड : जिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचारी हाजी शेख अहेमद बाबन यांचे दिनांक 11 जुलै 2026 शनिवार रोजी रात्री 08:00 वाजेच्या सुमारास वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची नमाज़ ए जनाज़ा बालेपीर दरगाह मस्जीद येथे पठण करण्यात आली. दफनविधी दरगाह कब्रस्तान येथे आज दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सकाळी 11:00 वाजता करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयासह आरोग्य क्षेत्र आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.
हाजी शेख अहेमद बाबन यांनी जिल्हा रुग्णालयात अनेक वर्षे मलम पट्टी विभागात सेवा केली. अत्यंत मनमिळावू आणि व्यवस्थित व चांगले काम करणारे कर्मचारी म्हणून ते सेवानिवृत्त होईपर्यंत ओळखले जायचे. त्यांना रुग्णसेवा करण्यात आनंद होत असे. जिल्हा रुग्णालयात कितीही गर्दी असली तरीही ते कधीही रुग्णांवर रागवायचे नाही. सर्वांशी प्रेमाने व आत्मीयतेने बोलणे करत काम करायचे. रुग्णसेवेसह त्यांना कव्वाली गायनाचाही छंद होता. दरगाह असो की जवळच्या लोकांकडे लग्न किंवा इतर कार्यक्रम असो, तिथे कव्वालीचा कार्यक्रम असला की ते हमखास कव्वाली गायचे. त्यांना सर्वचजण आदराने शेख अहेमद साहब म्हणायचे. त्यांच्या पश्चात स्टार बॅटरी चे मालक-संचालक शेख अब्दुस् समद, जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी शेख शकील या दोन मुलांसह तीन सुना, एक मुलगी-जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शेख कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात …………….. परिवार सहभागी आहे.

COMMENTS