Homeताज्या बातम्या

श्रीराम मंदिर चंदा चोरी विरोधात, काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह

अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या करोडो रुपयांच्या चंदा चोरी विरोधात, खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात व उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल प

महाराष्ट्रात भोंदू साधू, गुन्हेगार व अत्याचार्‍यांचे सरकार- डॉ. रॅपनवाड
राहुल गांधी भारतीय राजकारणातील सर्वाधिक ‘रिजेक्टेड’ व्यक्ती; देवेंद्र फडणवीसांचा दिल्लीतून जोरदार प्रहार
अयोध्या राम मंदिर देणगी प्रकरणी पाटोद्यात काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहश्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांविरोधात चौकशीची मागणी; पोलीस ठाण्यात दिले निवेदन



अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या करोडो रुपयांच्या चंदा चोरी विरोधात, खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात व उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांच्या पुढाकाराने नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महावीर चौक येथील हनुमान मंदिर परिसरात शुक्रवार (दि.10) रोजी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी टाळ मृदुंगच्या गजरात अभंगातून प्रभू श्रीरामाचा जयघोष करण्यात आला.
प्रभू श्रीरामाच्या नावाने राजकारण करत करत थेट अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या करोडो रुपयांचा चंदाचोरी पर्यंत या सरकारचा भ्रष्टाचार पोहोचला आहे. त्यामुळे या सरकारचा हिंदू नामक ढोंगी चेहरा जनतेपुढे आला आहे. अशी टीका खासदार तथा दक्षिण जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केली. उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांनी श्री राममंदिर चोरी विरोधात जोरदार निषेध व्यक्त केला. यावेळी माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. रेखाताई  चव्हाण, सुरेंद्र घोडजकर, एकनाथराव मोरे, आनंद चव्हाण, तिरुपती कोंढेकर, बालाजी गाडे, श्रीनिवास मोरे, महेश देशमुख तरोडेकर, सत्यपाल सावंत, मधूकर दिघे, अजिज कुरेशी, बाबुभाई खोकेवाले, फारुख भाई, शेर अली, आनंदराव कल्याणकर, बापूसाहेब पाटील, दीपकसिंग हुजुरीया, जसपालसिंग तबेलेवाले, बाळासाहेब आंबेगावकर, मधूकर सोनटक्के, जेशिका शिंदे, ज्योती कदम, सुरेखा वैद्य, विमलताई कीर्तने, मुरलीधर कल्याणकर, एस.पी. कुभांरे, गौतम सिरसाट, प्रबुद्ध चिते, प्रकाश दिपके, प्रसेनजित वाघमारे, सचिन टाले, गंगाधर आडेराव, संजय कौठेकर, गंगाधर डांगे, प्रितम जोंधळे, कलिम शेख, धनंजय उमरीकर, आदीसह इतर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पावडेवाडी येथील भजनी मंडळ हभप गोपीनाथ महाराज पावडेवाडीकर, हभप मोरे महाराज सोनखेडकर, रंजन पावडे, सोपान शिंदे, गंगाधर शिंदे, पांडुरंगराव पावडे, अशोक पावडे, ध्यानेश्वर पावडे आदीजण उपस्थित होते.

COMMENTS