Homeताज्या बातम्या

युवकांमध्ये गुंतवणूक ही विकसित भारताची सर्वात मोठी संपत्तीएमपी लीड उपक्रमाचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून कौतुक

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या ’एमपी लीड  या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, युवकांमध्ये के

विश्वकर्मा परिवारातर्फे रविवारी शिर्डीत पुरस्कार वितरण; समाजरत्न आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
ओबीसी विकासासाठी शासनाचा ठोस रोडमॅप; नांदेडमध्ये कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळावा उत्साहात
युवकांनी समाजविकासत योगदान द्यावे : चिंतामणी  



केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या ’एमपी लीड  या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, युवकांमध्ये केलेली गुंतवणूक ही विकसित भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचे प्रतिपादन केले. वाणिज्य भवन येथे आयोजित कार्यक्रमात एमपी लीड अंतर्गत निवड झालेल्या फेलोजशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना गोयल म्हणाले की, ’विकसित भारत-2047’ हे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग, सक्षम नेतृत्व आणि नवोन्मेषी विचारांची नितांत आवश्यकता आहे. भारताकडे जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असून, त्यांना दर्जेदार शिक्षण, कौशल्य, योग्य मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून दिल्यास भारत जागतिक नेतृत्वाच्या शिखरावर पोहोचू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संवादादरम्यान मार्गदर्शन, उद्योजकता, रोजगारनिर्मिती, नवोन्मेष आणि सर्वसमावेशक विकास या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. युवकांनी केवळ नोकरी शोधणारे न राहता रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनावे, असे आवाहनही गोयल यांनी केले. राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी सांगितले की, एमपी लीड उपक्रमाचा उद्देश गुणवंत युवकांना नेतृत्व, लोकसेवा आणि धोरणनिर्मिती प्रक्रियेशी जोडणे हा आहे. युवकांची ऊर्जा, सकारात्मक दृष्टीकोन आणि नवोन्मेषी विचार विकसित भारत-2047 च्या उद्दिष्टपूर्तीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असे त्यांनी नमूद केले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एमपी लीड हा अनुकरणीय उपक्रम असल्याचे सांगत डॉ. अजित गोपछडे यांचे अभिनंदन केले. तसेच निवड झालेल्या सर्व फेलोजना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात फेलोजना विविध राष्ट्रीय विषयांवर आपली मते मांडण्याची संधी मिळाली आणि देशाच्या विकासात सक्रिय सहभागाचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS