Homeताज्या बातम्या

नांदेड महानगरपालिका महिला बालकल्याण व शिक्षण समितीची आढावा बैठकमनपा शाळांच्या विकासाबरोबर महिला कल्याण योजनांनाही प्राधान्य देणार-सदिच्छा सोनी- पाटील

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण तसेच शिक्षण समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक समितीच्या सभापती सदिच्छा सोनी-पाटील यांच्या अध्यक्षत

मराठा आंदोलनातील 34 मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतशासनाचा निर्णय जारी, मनोज जरांगे यांच्या पाठपुराव्याला यश
कृषि विभागाची धडक कारवाईविनापरवाना बीटी कापुस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
श्रीराम मंदिर चंदा चोरी विरोधात, काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह



नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण तसेच शिक्षण समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक समितीच्या सभापती सदिच्छा सोनी-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीत महानगरपालिका शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा, आरोग्यविषयक उपक्रम तसेच महिलांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध कल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस उपसभापती निरंजना लांडगे यांच्यासह अमृताबाई ठाकूर, राजश्री गोडबोले, सुलोचना काकडे, मनप्रीतकौर कुंजीवाले, नीलम यादव, अलकेसरी सुमय्या आणि संध्या देमगुंडे उपस्थित होत्या. सदस्यांनी महानगरपालिका शाळांमधील पायाभूत सुविधांची स्थिती, इमारतींची दुरुस्ती, स्वच्छता, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य आणि दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना मांडल्या. विविध शैक्षणिक प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत आगामी काळात महानगरपालिका शाळांमध्ये व्यापक आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. विशेषतः शाळकरी मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे, यासाठी एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) प्रतिबंधक लसीकरण प्रभावीपणे राबविण्याच्या नियोजनाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. या उपक्रमामुळे भविष्यात गंभीर आजाराचा धोका कमी होण्यास मदत होणार असल्याने त्याला विशेष महत्त्व देण्यात आले. याशिवाय महिलांच्या सक्षमीकरणासाठी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याबरोबरच त्या जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. बैठकीस महानगरपालिकेचे अधिकारी डॉ. हनुमंत देठे, सुहास सोनुले, लखन बोळेगावे, निलावती डावरे, पतंगे, प्रवीण मगरे, दिलीप टाकळीकर आणि प्रवीणा मांदळे उपस्थित होते. नोडल अधिकारी चंद्रकांत कदम यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून बैठकीची सांगता करण्यात आली.

COMMENTS