Homeताज्या बातम्यादेश

कुख्यात गुंड अतिकचा मुलगा असदचे एन्काउंटर

उमेश पाल हत्येप्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांचे यश

प्रयागराज/वृत्तसंस्था ः उत्तरप्रदेशातील नावाजलेले उमेश पाल हत्येप्रकरणी कुख्यात गँगस्टर अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मद यांना उत्तरप्रदेश

निशा चव्हाण यांना मुक्ता साळवे पुरस्कार प्रदान
तलवार घेऊन ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न; पाहा व्हिडीओ l LOK News 24
अबुधाबीच्या पहिल्या हिंदू मंदिरात 350 सेन्सर

प्रयागराज/वृत्तसंस्था ः उत्तरप्रदेशातील नावाजलेले उमेश पाल हत्येप्रकरणी कुख्यात गँगस्टर अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मद यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. हे एन्काउंटर झाशीमध्ये झाले. दोघांवर 5 लाखांचे बक्षीस होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याजवळ विदेशी शस्त्रे सापडली आहेत. 24 फेब्रुवारी रोजी उमेश पालची हत्या केल्यापासून तो फरार झाला होता. पोलिस सतत त्यांचा शोध घेत होते आणि झाशी येथे त्यांचे लोकेशन मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचे एन्काउंटर केले.
24 फेब्रुवारीला भरदिवसा हत्या झालेल्या उमेश पाल यांची आई म्हणाली की, माझ्या मुलाला भररस्त्यात व घराजवळ गोळ्या घालून ठार केले होते. आज जी घटना घडली, त्या पोलिसांच्या कृत्याने माझ्या मनाला थोडी का हुईना शांती मिळाली आहे. माझ्या मुलाला ठार करणारे मारेकरी मारल्या गेले. या गोळीबार त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळाली आहे. देर आहे पण अंधेर नाही, योगीजींचे आभार..! प्रयागराज कोर्टात अतिक अहमदच्या रिमांडवर सुनावणी सुरू असताना या एन्काउंटरची बातमी समोर आली. अतिक अहमदला मंगळवारी साबरमती कारागृहातून प्रयागराज न्यायालयात आणण्यात आले. त्याचा भाऊ अशरफ यालाही न्यायालयात हजर करण्यात आले. उमेश पाल हत्येप्रकरणी पोलिसांना या दोघांची चौकशी करायची आहे. त्यांच्याकडे 200 प्रश्‍नांची यादी आहे. उमेश पाल हत्येप्रकरणी असदचे नाव आणि सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर शाईस्ताने अतिक अहमदवर नाराजी व्यक्त केली होती.

COMMENTS