Homeताज्या बातम्या

साईनाथ महाराजांच्या समाजसेवेचे महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडून कौतुकलोककल्याणकारी समाजसेवेची नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता

श्री आनंद दत्तधाम आश्रम, माहूरगडाचे महंत राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांच्या समाजोपयोगी कार्याची महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बाव

आरेत समृद्ध, प्रेरणादायी जंगल निर्माण करणार : मंत्री शेलार80 एकर जागेत 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ
सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीकराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन
मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करा



श्री आनंद दत्तधाम आश्रम, माहूरगडाचे महंत राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांच्या समाजोपयोगी कार्याची महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष दखल घेत गौरव केला. यावेळी मंत्री आशिष शेलार यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करत अभिनंदन केले.
महाराष्ट्र शासनाने यापूर्वी साईनाथ महाराज यांची औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मार्गदर्शक, स्वच्छता अभियानाचे राज्य ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांनी राज्यभर तसेच राज्याबाहेर विविध लोककल्याणकारी उपक्रम प्रभावीपणे राबविले. साईनाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान, शिक्षण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, ’पाणी जिरवा-पाणी वाचवा’ अभियान, प्रदूषण नियंत्रण, व्यसनमुक्ती, शेतकरी प्रबोधन, रक्तदान शिबिरे तसेच आध्यात्मिक उन्नतीसाठी विविध कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा कार्यप्रगती अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असून त्याची दखल घेत मंत्री बावनकुळे यांनी महाराजांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी संभाजीनगर येथील उद्योजक सुरेश जगाडे, दत्तकृपा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद देवडे, रामभाऊ ठोंबरे, विशाल डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. धोंड्याच्या महिन्यात साईनाथ महाराज यांनी श्री आनंद दत्तधाम आश्रमात संपूर्ण महिना वास्तव्यास राहून राज्यभरातून आलेल्या भाविकांसाठी अन्नदान महापंगतीचे आयोजन केले. हजारो भाविकांना भोजन प्रसाद देण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले. स्वच्छता, वृक्षलागवड आणि समाजजागृतीच्या कार्याला दिलेले प्राधान्य लक्षात घेता, साईनाथ महाराज यांच्यावर भविष्यात शासनाकडून आणखी मोठी लोककल्याणकारी जबाबदारी सोपविण्याचे संकेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री आशिष शेलार यांनी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून माहूरगडाच्या लौकिकात आणखी भर पडेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यातील विविध आयटीआय संस्था, शाळा व सामाजिक संस्थांमध्ये साईनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, साहित्य वाटप आणि विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने सुरू आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाकडून भविष्यात आणखी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS