आजचे राशिभविष्य २८ सप्टेंबर २०२१

Homeफीचर

आजचे राशिभविष्य २८ सप्टेंबर २०२१

मेष:-योग्य मान मिळेल. आपले डोके शांत ठेवावे. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कार्यक्षेत्रात नवीन आव्हान सामोरी येऊ शकतात. समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा

Aurangabad : “या” मातेवर आली वृद्धाश्रमात राहण्याची वेळ
आजचे राशीचक्र सोमवार, ०४ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा
परतीच्या पावसाला सुरुवात… हवामान विभागाने केले जाहीर…

मेष:-
योग्य मान मिळेल. आपले डोके शांत ठेवावे. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कार्यक्षेत्रात नवीन आव्हान सामोरी येऊ शकतात. समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण कराल.शुभ अंक 2 शुभ रंग निळा

वृषभ:-
जुनी येणी वसूल होतील. जुन्या ओळखीच्या लोकांच्या भेटी होतील. स्पर्धकांना नामोहरम करायला थोडे अधिक कष्ट पडतील. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. जोडीदाराच्या भावना समजून घ्याल. शुभ अंक ६ शुभ रंग नारंगी

मिथुन:-
घरातील कामे पूर्ण होतील. दिवस धावपळीचा जाईल. मुलांकडून सकारात्मक वार्ता मिळतील. तुमचे मनोबल वृद्धिंगत होईल. कुटुंबासोबत दिवस मजेत जाईल. शुभ अंक २ शुभ रंग हिरवा

कर्क:-
घाईघाईने कामे करावी लागतील. दिवसाचा उत्तरार्ध मजेत जाईल. आध्यात्मिक आवड वाढेल. व्यवसाय विस्ताराच्या विचारावर ठाम राहाल. जोडीदाराच्या यशाने आनंदी व्हाल.शुभ अंक ९ शुभ रंग गुलाबी

सिंह:-
लोकांची प्रशंसा लाभेल. कामे जलद गतीने उरकावी लागतील. दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल. सरकारी योजनांचा लाभ मिळवाल. कौटुंबिक खर्चावर आळा घालावा.शुभ अंक ३ शुभ रंग पोपटी

कन्या:-
दिवस आनंदात जाईल. घरातील थोरांचे आशीर्वाद घ्या. व्यापारी कौशल्य वापराल. पुढील सोयीसाठी गुंतवणूक कराल. ज्येष्ठांची सेवा करण्याची संधी मिळेल.शुभ अंक ५ शुभ रंग नारंगी

तूळ:-
कामाचा व्याप वाढेल. जुनी कामे मार्गी लावाल. संमिश्र घटनांचा दिवस. मनाच्या चंचलतेला आवर घालावी लागेल. विनाकारण धावपळ वाढेल. शुभ अंक ६शुभ रंग काळा

वृश्चिक:-
शांत डोक्याने विचार करावा. विचारपूर्वक कामे करावीत. आव्हान स्वीकारताना सावध राहावे. अथक मेहनत यश मिळवून देऊ शकेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. शुभ अंक ८ शुभ रंग पोपटी

धनू:-
मनातील इच्छा पूर्ण होईल. दिवसाचा बराच काळ धार्मिक कामात घालवाल. समाजात तुमचा मान वाढेल. धनसंचयात वाढ होईल. मित्रांची मदत फायदेशीर ठरेल.शुभ अंक १ शुभ रंग निळा

मकर:-
आपले मत योग्य प्रकारे पट‍वून द्याल. दिवसभर कामाची धावपळ राहील. वडीलधार्‍यांना नाराज करू नका. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. अनावश्यक खर्च टाळावेत.शुभ अंक ७ शुभ रंग नारंगी

कुंभ:-
विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. भागीदाराच्या मताचा आदर करावा. तरच यशदायी परिणाम दिसतील. प्रलंबित येणी प्राप्त होतील. कौटुंबिक वादाचे प्रसंग टाळावेत. शुभ अंक ६ शुभ रंग गुलाबी

मीन:-
अतिविचार करत बसू नका. नवीन ओळखीतून मैत्री वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत सापडतील. व्यावसायिक गुंतवणूक लाभदायक असेल. जोडीदाराच्या साथीने समोरील प्रश्न सोडवाल.शुभ अंक ४ शुभ रंग लाल

COMMENTS