Homeताज्या बातम्या

पोलीस बंदोबस्तामध्ये झाली मोजणी ; परिसरात तणावराशीन ग्रामपंचायतच्या अतिक्रमित जागेची मोजणी पूर्ण; कारवाईचा मार्ग मोकळा

कर्जत : गेल्या नऊ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राशीन ग्रामपंचायतीच्या मालकीच्या अतिक्रमित जागेच्या मोजणीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, भूमी

घारगाव–पिंपळगाव पिसा रस्त्यालगत उघडी विहीरअपघाताचा धोका;  प्रशासनाने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
चर्च कारवाईविरोधात ख्रिस्ती समाज आक्रमकप्रशासनाच्या भूमिकेवर सवाल ; मंत्री आठवलेंकडे मांडली व्यथा
श्रीगोंद्यात अवैध मुरूम उत्खननाचा सुळसुळाटपर्यावरण धोक्यात, शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचा आरोप

कर्जत : गेल्या नऊ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राशीन ग्रामपंचायतीच्या मालकीच्या अतिक्रमित जागेच्या मोजणीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, भूमी अभिलेख विभागाने शुक्रवारी (दि. १० जुलै) गट क्रमांक १४७६ व १४७७ मधील जागेची अधिकृत मोजणी पूर्ण केली. या मोजणीमुळे अतिक्रमण हटविण्याच्या पुढील प्रशासकीय कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत योगेंद्र सांगळे यांनी मुख्यमंत्री सचिवालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने दखल घेत ही मोजणी प्रक्रिया राबविण्यात आली.मोजणीदरम्यान भूमी अभिलेख विभागाचे शिरस्तेदार सुनील धामणे, मोजणी अधिकारी प्रशांत थोरात, संजय धनवडे, पठाण, चतुर, गायकवाड आणि पंकज निमसे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मोजणीची जबाबदारी पार पाडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे यांनी संपूर्ण प्रक्रियेचे समन्वयन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली गट विकास अधिकारी सूर्यवंशी, सहाय्यक गट विकास अधिकारी गार्डे आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.यावेळी योगेंद्र सांगळे यांनी सांगितले की, इंदिरा आवास, रमाई आवास आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधलेल्या घरांना कोणतीही बाधा न आणता कायदेशीर चौकटीत पुढील कारवाई केली जाईल.  ग्रामपंचायत सर्वसामान्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.दरम्यान, नऊ महिन्यांनंतर मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. आता प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS