भातकुडगाव फाटा : नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यांचे तज्ञ संचालक पदी शेवगाव पंचायत समि

भातकुडगाव फाटा : नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यांचे तज्ञ संचालक पदी शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.क्षितिज नरेंद्र घुले पाटील व रविंद्र काशिनाथ नवले पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.कारखान्याच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवारी (दि.१०) अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, संचालक पंडितराव भोसले, अशोकराव मिसाळ,डॉ.नारायण म्हस्के,जनार्धन कदम, मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी, ऍड.हिम्मतसिंह देशमुख, अमोल अभंग, विकास नन्नवरे,संतोष पावसे, जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड,काशिनाथ नवले, दत्तात्रय काळे, अशोक तानवडे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे,कामगार संचालक सुखदेव फुलारी, तांत्रिक सल्लागार ए.बी.खरड, एम.एस.मुरकुटे, एस.डी.चौधरी, महेंद्र पवार, प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, विलास लोखंडे, सुधाकर ढाकणे, हनुमंता शेंडगे, महेश भवर, दत्तात्रय चिमणे, कल्याण जांभूळकर आदी उपस्थित होते.

COMMENTS