कोपरगाव : संजीवनी युनिव्हर्सिटी मधील एकूण १६ विद्यार्थ्यांची रशियातील प्रतिष्ठित युरल फेडरल युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड झाली. हे सर्व विद्यार्थी नुकतेच १५ दिवसांच्या इंटर्नशिपसाठी रशियाला रवाना झाले आहेत. संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नामुळे २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अशी संधी प्राप्त झाली आहे.रशियाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यश संकोशकुमार रणेजा, ओम सुनील कपिले, साईश दिनेश शिंदे, सैफुल्लाह पठाण शफिकखान, स्वप्नील संदीप गिते, अदिती प्रदीप औताडे, आरोही शांताराम घुमरे, आदित्य सचिन बोठे, साईराज अशोक चव्हाण, सिद्धी तिरसे, साक्षी कदम, साईश पोकळे, सिद्धांत गोंदकर, आयुश रॉय, जय काजळे व तिथी मालकर यांचीही निवड झाली आहे. डॉ. सुप्रिया भगवत आणि प्रा. वेंकट रेड्डी हे या विद्यार्थ्यांसोबत रशियाला गेले असून, विद्यार्थी तेथील प्राध्यापक व संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली विविध संशोधन प्रकल्पांवर काम करणार आहेत.स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर केवळ डिग्री असून चालत नाही, त्यामुळे आमचा सर्व भर विध्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण, इंडस्ट्री एक्सपर्ट यांचे मार्गदर्शन व इंटर्नशिप यावर असतो. १६ विद्यार्थी रशियात जाऊन युरल फेडरल युनिव्हर्सिटीतील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्च प्रकल्पांवर काम करणार आहेत. या अनुभवातून त्यांना जागतिक दर्जाचे संशोधन, नवे तंत्रज्ञान समजेल. यापूर्वी संजीवनीच्या विद्यार्थ्यांना तैवान, कॅनडा, फिलिपाईन्स, ट्युनिशिया, युनायटेड किंगडम, इत्यादी देशांमधील नामांकित विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळाली. भविष्यातही विध्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी संजीवनी कायम प्रयत्नशील राहिल.- अमित कोल्हे, प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी

COMMENTS