Homeताज्या बातम्या

म.फु.कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र समिती स्थापन होणार 

अहिल्यानगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या आणि प्रलंबित प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा सर्वंकष अभ्यास करून त्यावर योग्य मार्ग काढण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात येणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, त्यांच्या प्रलंबित प्रश्नांचे लवकरात लवकर निराकरण व्हावे आणि शासन स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावेत, यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.या बैठकीस आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार अक्षय कर्डिले, जिल्हाधिकारी पंकज आशिया, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव राजेंद्र पाटील, मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी
नाशिक-पुणे जलद रेल्वे मार्गाबाबत आज मुख्यमंत्र्यांशी चर्चाराहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेचाही प्रश्न मांडणार; पालकमंत्री विखेंसह सर्व आमदारांची उपस्थिती
राहुरी पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात

COMMENTS