महाराष्ट्र वक्फ महामंडळाचे अध्यक्ष ना. समीर काझी यांच्या नेतृत्वाखाली वक्फ महामंडळाच्या कार्यपद्धतीत होत असलेल्या सकारात्मक बदलांचे आणि उल्लेखनीय

महाराष्ट्र वक्फ महामंडळाचे अध्यक्ष ना. समीर काझी यांच्या नेतृत्वाखाली वक्फ महामंडळाच्या कार्यपद्धतीत होत असलेल्या सकारात्मक बदलांचे आणि उल्लेखनीय प्रगतीचे मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनने स्वागत केले आहे. वक्फ मालमत्तांच्या संरक्षण, व्यवस्थापन आणि पारदर्शक कारभारासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल फाउंडेशनच्या वतीने ना. समीर काझी यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्रातील वक्फ मालमत्तांचा योग्य वापर, त्यांचे संरक्षण आणि प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी वक्फ महामंडळाकडून विविध सुधारणा राबविण्यात येत आहेत. मालमत्तांच्या नोंदणी प्रक्रियेला गती देणे, प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करणे, वक्फ संपत्तीची अचूक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी जीपीएस मॅपिंग करणे तसेच संपूर्ण व्यवस्थेचे डिजिटायझेशन करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. या तंत्रज्ञानाधारित उपक्रमांमुळे वक्फ मालमत्तांची माहिती अधिक सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार असून, अनधिकृत वापर आणि गैरव्यवहारांना आळा बसण्यास मदत होईल. तसेच वक्फ संपत्तीचा उपयोग शैक्षणिक, सामाजिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांसाठी अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनने म्हटले आहे की, वक्फ महामंडळासमोर असलेल्या आव्हानांवर मात करत आधुनिक प्रशासन पद्धतीचा अवलंब करण्याचे काम ना. समीर काझी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे वक्फ व्यवस्थापनात शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला चालना मिळत आहे. वक्फ मालमत्ता ही समाजाची अमूल्य संपत्ती असून तिचे संरक्षण करणे आणि तिचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करणे ही काळाची गरज आहे. या दृष्टीने वक्फ महामंडळाच्या माध्यमातून सुरू असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे फाउंडेशनने नमूद केले. यावेळी मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अरफात खान, सचिव सय्यद सलमान, कोषाध्यक्ष वाजेद मोमीन तसेच काझी आमेर यांनी ना. समीर काझी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वक्फ महामंडळ समाजहिताचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेईल, असा विश्वास व्यक्त केला.

COMMENTS