Homeताज्या बातम्या

गेवराईत कृषी पंडित भागूजीराव ढेकळे विद्यालयात वृक्षारोपण उपक्रम

तालुक्यातील कृषी पंडित भागूजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात जागतिक पर्यावरण दिन व वन महोत्सवानिमित्त वृक्षारोपण कार्यक्

गेवराई पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, 12 जण ताब्यात, 6.63 लाखांचा मुद्देमाल जप्त
कवडगाव (खेडकर वस्ती) येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात  प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
गेवराईत बनावट ‘सिंधी’ गुत्त्यावर छापा; 4.71 लाखांचा मुद्देमाल जप्त



तालुक्यातील कृषी पंडित भागूजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात जागतिक पर्यावरण दिन व वन महोत्सवानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य थिटे ए. एस., वनरक्षक श्रीमती सारिका हांगे, विद्यालयातील कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

COMMENTS