Homeताज्या बातम्या

बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणनगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

बीड शहरात शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्ग

डंपरच्या मुजोरपणामुळे शेवगावकर वैतागले शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम 
आनंदगाव-सारणी रस्त्याची चाळण: गुडघाभर खड्ड्यांतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचा निषेध
महिनाभरापूर्वी बांधलेल्या पुलाला भगदाडनगर-मनमाड महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह



बीड शहरात शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्ग सुरू असल्याने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सारडा नगरी मार्केट परिसर तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय ते पालवन चौक या मार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने भटकी कुत्री रस्त्यावर वावरत असतात. दुचाकी अथवा चारचाकी वाहन दिसताच कुत्र्यांचे थवे वाहनांच्या मागे धावत भुंकत असल्याने अपघाताचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रात्री प्रवास करणार्‍या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण, नियोजनबद्ध स्थलांतर तसेच आवश्यक ती प्रतिबंधात्मक कार्यवाही तातडीने राबविण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या समस्येकडे वेळेत लक्ष न दिल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, अशी चर्चा शहरात सुरू असून प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

COMMENTS