Homeताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त पर्यावरण रक्षणाचे आवाहन करणार्‍या पंकजाताईंचे बीडमधील 42 कोटींच्या कथित कागदोपत्री वृक्षलागवड प्रकरणी मौन का?बोगस वृक्षलागवडीची चौकशी करून दोषींवर कारवाईची डॉ. गणेश ढवळे यांची मागणी

बीड : पर्यावरण संतुलित राखण्यासाठी राज्यात 33 टक्के वनक्षेत्र आवश्यक असताना बीड जिल्ह्यात केवळ 2.5 टक्के वनक्षेत्र असल्याने जिल्ह्याला वारंवार दु

तटकरे विरूद्ध रोहित पवार वाद उफाळलावर्षा निवासस्थानाचे उंबरठे कोणी झिजवले ?
आम्ही तोडण्यासाठी नव्हे, जोडण्यासाठी काम करतोसचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री शिंदेेंचा उद्धव ठाकरेंना टोला
इतर राज्यातील मुख्यमंत्री उदयोग धंदे पळवतील अस होत नाही :अजित पवार | LOKNews24


बीड : पर्यावरण संतुलित राखण्यासाठी राज्यात 33 टक्के वनक्षेत्र आवश्यक असताना बीड जिल्ह्यात केवळ 2.5 टक्के वनक्षेत्र असल्याने जिल्ह्याला वारंवार दुष्काळी संकटाचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत झालेल्या कथित 42 कोटी रुपयांच्या कागदोपत्री वृक्षलागवड प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपल्या 26 जुलैच्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे, पुष्पगुच्छ, बॅनरबाजी व अनावश्यक खर्च टाळून त्याऐवजी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान, जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाशी संबंधित उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. माझ्यासाठी घरासमोर एक वृक्ष लावा, पर्यावरण जपा आणि वसुंधरा रक्षक बना, असेही त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. ढवळे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, पर्यावरण संवर्धनाचे आवाहन करणार्‍या पर्यावरण मंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील कथित बोगस वृक्षलागवड प्रकरणाबाबत अद्याप मौन का बाळगले आहे? डॉ. ढवळे यांच्या म्हणण्यानुसार, 7 ऑगस्ट 2025 रोजी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत एका दिवसात तब्बल 30 लाख वृक्षलागवड झाल्याचा दावा करण्यात आला. हा उपक्रम केवळ इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याच्या उद्देशाने कागदोपत्री दाखविण्यात आला असून, यामध्ये जनतेच्या सुमारे 42 कोटी रुपयांचा अपव्यय झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, नियोजनाचा अभाव, रोपवाटिकेच्या वेळापत्रकाचे पालन न होणे, अपरिपक्व व निकृष्ट दर्जाच्या रोपांची लागवड, तसेच वृक्ष संकल्पनेत नसलेल्या तुती व पळाटी यांसारख्या रोपांचा समावेश करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोपे नष्ट झाली. प्रत्यक्षात वृक्षलागवड न करता केवळ कागदोपत्री आकडे दाखवून आर्थिक अपहार झाल्याचा संशय असल्याने या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
चौकट
पर्यावरण रक्षणाचे आवाहन पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी 26 जुलैच्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे, बॅनरबाजी आणि इतर अनावश्यक खर्च टाळून प्रत्येकाने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता, जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत, तसेच प्रत्येक घरासमोर किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले आहे.
चौकट
डॉ. ढवळे यांचा सवाल बीड जिल्ह्यातील हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत झालेल्या कथित 42 कोटी रुपयांच्या कागदोपत्री वृक्षलागवड प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार का? पर्यावरण रक्षणाचे आवाहन करणार्‍या पर्यावरण मंत्र्यांनी या गंभीर प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

COMMENTS