Homeताज्या बातम्या

डॉ. उपाध्ये संपादीत ’अमृतमंथन’ गौरवग्रंथाचे रविवारी प्रकाशन

श्रीरामपूर : येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये संपादीत ’अमृतमंथन’ माजी प्राचार्य सौ. मंगल

श्रीरामपूर मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘साहित्यिक फेरफटका’ कर्मवीर चरणी स्तुत्य मानवंदना : प्राचार्य डॉ. शंकरराव गाजरे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे कार्य प्रेरणादायी; प्रा. टी. ई. शेळके यांचे प्रतिपादन
सेवानिवृत्ती म्हणजे सेवाभावाचा आदर्श : सैंदोरे


श्रीरामपूर : येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये संपादीत ’अमृतमंथन’ माजी प्राचार्य सौ. मंगल श्रीधर पाटील गौरवग्रंथाचे प्रकाशन रविवार दि. 12 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या खंडाळा, उंदीरगाव शाखेतील शिक्षिका आणि सातारा येथून प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या तसेच सध्या सातारा येथील सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शिक्षणोत्तेजक पतसंस्थेच्या चेअरमन प्राचार्य सौ. मंगल श्रीधर पाटील ह्या कार्यरत आहेत. त्यांचे ’आठवणींचा गुलमोहर’, ’मंगलपर्व’, ’आयुष्याच्या वळणावर’ ही पुस्तके आणि इतर लेखन प्रसिद्ध आहे. प्राचार्य एस.सी. पाटील व प्राचार्य मंगलताई पाटील यांनी प्राध्यापक म्हणून श्रीरामपूर येथे 25 वर्ष अध्यापन केले. त्यांचे हजारो विद्यार्थी या परिसरात आहेत. प्राचार्य सौ. मंगलताई पाटील यांचा अमृतमहोत्सवी जीवनपदार्पण सोहळा तसेच श्रीरामपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये व सातारा येथील प्रा.डॉ. नेहा नितीन पाटील संपादित ’अमृतमंथन’ या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, शेतकरी नेते राजू शेट्टी, सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, श्रीरामपूर येथील माजी प्राचार्य टी.ई. शेळके, डॉ. संजय शेळके, डॉ. अर्चना शेळके, नाशिक येथील आमदार डॉ.राहूल आहेर, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे हे उपस्थित राहणार आहेत. सातारा येथील सदर बाजार परिसरातील कनिष्क मल्टिपर्पज हॉलमध्ये संपन्न होणार्‍या या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी प्राचार्य एस.सी.पाटील, संपादक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. डॉ. नेहा पाटील, डॉ. सचिन पाटील, डॉ. अनुराधा पाटील, इंजिनिअर नितीन पाटील, सौ. स्वप्ना समीर बुर्ले आदिंनी केले.

COMMENTS