Homeताज्या बातम्या

सीबीएसईकडून अन्वर शेख जिल्हा प्रशिक्षण समन्वयक तर अभिलाष के. के. यांची उपजिल्हा प्रशिक्षण समन्वयकपदी पुनर्नियुक्तीवर्षभरातील उल्लेखनीय कार्याची दखल; बीड जिल्ह्याच्या प्रशिक्षण समन्वयाची पुन्हा जबाबदारी

बीड : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) उत्कृष्टता केंद्र, पुणे यांनी सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी सिंदफणा पब्लिक स्कूल, माजलगावचे

‘झोपु’ योजनांसाठी आठ वित्तीय संस्थांची तयारी
मुलाच्या पार्टनरशिपच्या प्रश्‍नावर सोमय्यांची बोबडी
अंबाजोगाईत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल


बीड : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) उत्कृष्टता केंद्र, पुणे यांनी सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी सिंदफणा पब्लिक स्कूल, माजलगावचे प्राचार्य अन्वर खाजामिया शेख यांची जिल्हा प्रशिक्षण समन्वयक (डीटीसी), तर महावीर इंग्लिश स्कूल, कडा-आष्टीचे प्राचार्य अभिलाष के. के. (कुडियाथू) यांची उपजिल्हा प्रशिक्षण समन्वयक (डीडीटीसी) म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे. गेल्या वर्षभरात दोघांनीही बीड जिल्ह्यात सीबीएसईच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून शाळा आणि सीबीएसई यांच्यात सशक्त समन्वय निर्माण केला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सीबीएसईने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. दि. 8 जुलै 2026 रोजी त्यांच्या अधिकृत ई-मेलवर पुनर्नियुक्तीचे पत्र पाठविण्यात आले.
गेल्या वर्षभरात प्राचार्य अन्वर शेख आणि प्राचार्य अभिलाष के. के. यांनी बीड जिल्ह्यातील सीबीएसई संलग्न शाळांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबविले. ’ट्रेन द ट्रेनर’ उपक्रमाच्या माध्यमातून 80 हून अधिक शिक्षकांना सीबीएसईचे अधिकृत प्रशिक्षक म्हणून प्रमाणित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच ’जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक अध्यापन हा महत्त्वपूर्ण उपक्रम बीड सहोदयच्या माध्यमातून यशस्वीपणे आयोजित करून शिक्षकांना प्रभावी अध्यापन पद्धती, नाविन्यपूर्ण अध्यापन तंत्रे आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. जिल्ह्यातील सर्व सीबीएसई संलग्न शाळांमध्ये विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच शाळा आणि सीबीएसई यांच्यामधील समन्वयाची जबाबदारीही प्रभावीपणे पार पाडली.  याशिवाय, पंतप्रधानांच्या ’परीक्षा पे चर्चा’ या राष्ट्रीय उपक्रमात महाराष्ट्रातील सीबीएसई संलग्न शाळांपैकी बीड जिल्ह्यातील शंभर टक्के शाळांची नोंदणी पूर्ण करून बीड जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. हा मान प्राचार्य अन्वर शेख आणि प्राचार्य अभिलाष के. के. यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वामुळे मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील सर्व सीबीएसई शाळांमध्ये शिक्षक प्रशिक्षण, क्षमता विकास, शैक्षणिक नवोपक्रम आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीला मोठी चालना मिळाली. त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यातील सीबीएसई शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षक प्रशिक्षण अधिक सक्षम होईल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.

COMMENTS