Homeताज्या बातम्या

राज्यात पावसाचा जोर ओसरला

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून राज्यभर धुमाकूळ घालणार्‍या मुसळधार पावसाचा जोर गुरुवारी काहीसा कमी झाल्याचे चित्र दिसून आले. अनेक ठिकाणी नद्या, ओढ

29 जूनच्या ‘शेतकरी एल्गार’मधून सरकारला गुडघ्यावर बसवू; रोहित पवारांचा इशाराकर्जमाफी, पीकविमा, विकास अनुशेष, नीट गैरव्यवहारासह विविध मुद्द्यांवर सरकारवर हल्लाबोल
फोल हवामान अंदाज; निसर्गाचा इशारा आणि पावसाचा कहर!
मुंबईसह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचा हाहाकारअतिवृष्टीमुळे पूरस्थिती ; रस्ते झाले जलमय, अनेक ठिकाणी संपर्क तुटला
Maharashtra Weather Alert: 17 Districts Under Warning, Vidarbha Sees Relief


मुंबई : गेल्या चार दिवसांपासून राज्यभर धुमाकूळ घालणार्‍या मुसळधार पावसाचा जोर गुरुवारी काहीसा कमी झाल्याचे चित्र दिसून आले. अनेक ठिकाणी नद्या, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आज पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तरीही काही भागांत अतिवृष्टीची शक्यता कायम असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने राज्यातील 17 जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. त्यापैकी पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना तीव्र पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, उर्वरित 15 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट इशारा कायम ठेवण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश भागात आज पावसाने विश्रांती घेतली आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता अत्यल्प असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, या दोन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

COMMENTS