Homeताज्या बातम्या

चकलाांबा व माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीसबीड स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी

बीड : बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी घडलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असून दोन वेगवे

कल्याणमध्ये कुख्यात गुंड पोलिसांच्या ताब्यात
देवळालीत हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा चौघांवर गुन्हा ; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त
जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त


बीड : बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी घडलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असून दोन वेगवेगळ्या प्रकरणांचा यशस्वी उलगडा करण्यात आला आहे.
चकलाांबा पोलीस ठाणे गु.र.नं. 167/2026 अन्वये दाखल गुन्ह्यात गेवराई रोडवरील सूरज बिअर बार अँड परमिट रूम येथे अज्ञात चोरट्यांनी खिडकी तोडून विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या तसेच गल्ल्यातील रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गेवराईकडे चकलाांबा रोडने येत असल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेने महार टाकळी परिसरात सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यामध्ये काशिक शिरसिंग नागपुरे (रा. मुंढवा, पुणे), आदित्य मयूर जाधव (रा. मांजरी, पुणे) आणि हर्षवर्धन मोहन रेड्डी (रा. केशवनगर, पुणे) यांचा समावेश आहे. चौकशीत त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली असून त्यांना पुढील कारवाईसाठी चकलाांबा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. 153/2026 अंतर्गत दाखल घरफोडी प्रकरणाचाही स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून उलगडा केला आहे. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे 80,500 किंमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोन्ही यशस्वी कारवाया बीडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पोनि. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. चकलाांबा प्रकरणात पोउपनि श्रीराम खटावकर, श्रीखर औटे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने आणि माजलगाव प्रकरणात पोउपनि महेश विघ्ने व त्यांच्या पथकाने विशेष कामगिरी बजावली.

COMMENTS