Homeताज्या बातम्या

विषमुक्त शेतीचा यशस्वी पॅटर्न; ’एनश्योर सर्टिफिकेशन’ कडून सेंद्रिय मानांकन बहाल

 रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला असताना आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला असताना, शाश्वत आणि विषमुक्त शे

किनवटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी; भीम अनुयायांचा जनसागर
महावितरणचा ’स्मार्ट’ कारभार, जनता अंधारात लाचार; किनवट-गोकुंद्यात ’मार्च एंड’चा फटका की नियोजनाचा अभाव?
गोकुंदा येथील सरतापे कुटुंबाची ’यशाची हॅट्ट्रिक’; सुमेध, श्वेता आणि अंकिताची गरुडझेप!



 रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला असताना आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला असताना, शाश्वत आणि विषमुक्त शेती ही काळाची गरज बनली आहे. नेमका हाच धागा पकडून किनवट परिसरातील प्रगतशील शेतकरी अरविंद माधवराव सूर्यवंशी यांनी सेंद्रिय शेतीत एक मोठी आणि कौतुकास्पद झेप घेतली आहे. त्यांच्या अथक परिश्रमाला आता केंद्र सरकारची अधिकृत मान्यता मिळाली असून, त्यांच्या कृषी उत्पादनांना भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ’पीजीएस-इंडिया’ कडून अधिकृत सेंद्रिय प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
अरविंद माधवराव सूर्यवंशी (वैयक्तिक शेतकरी) यांना हे मानांकन ’पीक उत्पादन’ या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी देण्यात आले आहे. हे सेंद्रिय प्रमाणपत्र 8 एप्रिल 2026 पासून 8 एप्रिल 2027 पर्यंत वैध असणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक परिषदेच्या अंतर्गत नामांकित ’एनश्योर सर्टिफिकेशन सर्व्हिस प्रा. लि.’ या संस्थेमार्फत सूर्यवंशी यांच्या शेतीची, पिकांची आणि उत्पादन पद्धतीची अत्यंत काटेकोरपणे तपासणी करून हे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. अरविंद सूर्यवंशी यांनी ’पीजीएस-इंडिया नॅशनल स्टँडर्ड्स फॉर ऑरगॅनिक प्रॉडक्शन’च्या अत्यंत कडक आणि क्लिष्ट अशा सर्व निकषांची यशस्वीपणे पूर्तता केली आहे. या मानांकनाचे अनेक दूरगामी फायदे आता त्यांना आणि परिसराला मिळणार आहेत. या सरकारी प्रमाणपत्रा मुळे सूर्यवंशी यांच्या शेती उत्पादनांना बाजारात ’शंभर टक्के सेंद्रिय उत्पादन’ म्हणून हक्काची आणि विश्वासाची ओळख मिळणार आहे. वाढत्या आरोग्याविषयीच्या जागरूकतेमुळे सेंद्रिय मालाला बाजारात मोठी मागणी आहे. या प्रमाणपत्राच्या जोरावर त्यांच्या मालाला थेट ग्राहकांकडून आणि मोठ्या बाजारातून अधिक चांगला व प्रिमियम भाव मिळण्यास मदत होईल. सूर्यवंशी यांच्या या अभूतपूर्व यशामुळे किनवट आणि परिसरातील इतर पारंपरिक व रासायनिक शेती करणार्‍या शेतकर्‍यांना मोठा धीर मिळाला आहे. रासायनिक शेतीचा खर्च आणि दुष्परिणाम टाळून सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी हे यश परिसरातील शेतकर्‍यांसाठी दीपस्तंभासारखे काम करेल. अरविंद माधवराव सूर्यवंशी यांनी मिळवलेले हे यश केवळ एका शेतकर्‍याचे नसून, संपूर्ण किनवट परिसरातील शाश्वत आणि पर्यावरणपूरक कृषी क्रांतीची ही एक नवी पहाट आहे! त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS