शेवगाव : आषाढी वारीनिमित्त नवीन दहिफळ व पंचक्रोशीतील गावांतील वारकरी भाविकांच्या सहभागातून निघणाऱ्या गोमाता दिंडी क्रमांक २४४ चे मंगळवार (दि. ७) रोजी उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. ह.भ.प. राम काळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यात महिला-पुरुष वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दिंडीच्या प्रस्थानापूर्वी पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करण्यात आली. नवीन दहिफळच्या सरपंच सौ. सविता बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात तसेच “ज्ञानोबा-तुकाराम” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.ही दिंडी नवीन दहिफळ येथून आळंदीमार्गे संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. यावेळी वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जपत भक्ती, शिस्त, समता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या दिंडीच्या प्रस्थानामुळे नवीन दहिफळ परिसरात आषाढी वारीचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

COMMENTS