Homeताज्या बातम्यादेश

लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर निर्बंध

केंद्र सरकारचा ‘मेक इन इंडिया’ची मोहीमेसाठी निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी : स्वदेशी उत्पादनाला चालना मिळण्यासाठी अणि केंद्र सरकारची महत्वाकांक्षी मोहीम असलेल्या ‘मेक इन इंडिया’ला बळ देण्यासाठी केंद्

अविनाश भोसलेच्या चार कोटींच्या संपत्तीवर ईडीकडून टाच
सलमान खानच्या ‘नो एंट्री’ मध्ये होणार 10 अभिनेत्रींची एंट्री? | LOKNews24
 राहाता तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

नवी दिल्ली/प्रतिनिधी : स्वदेशी उत्पादनाला चालना मिळण्यासाठी अणि केंद्र सरकारची महत्वाकांक्षी मोहीम असलेल्या ‘मेक इन इंडिया’ला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्युटरच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळणार आहे.देशांतर्गत स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एचसीएन 8471 अंतर्गत लगावण्यात आलेल्या निर्बंधांची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत विदेशी व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनामध्ये माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅबलेट, कम्प्युटरच्या आयातीवर निर्बंध लागू केले आहेत. विदेशी व्यापार महासंचालनालयाने या संदर्भात अधिसूचना काढली आहे. त्यानुसार, एचसीएन 8741 अंतर्गत येणारे लॅपटॉप, टॅब्लेट, ऑल इन वन पर्सनल कम्प्युटर, अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर कम्प्युटर आणि सर्व्हरच्या आयातीवर निर्बंध असतील. निर्बंध घातलेल्या वस्तूंपैकी काही निवडक वस्तूंच्या आयातीस अटीशर्तींसह सूट दिली जाईल. मात्र, त्यासाठी कायदेशीर परवाना घ्यावा लागेल. हे निर्बंध बॅगेज नियमांतर्गत होणार्‍या आयातीवर लागू होणार नाहीत, अशी माहिती वाणिज्य व व्यापार मंत्रालयाने दिली आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि वैयक्तिक वापरासाठी एका वेळेस 20 वस्तूंच्या आयातीस सूट दिली जाणार आहे. विशिष्ट उद्देशांसाठी या वस्तूंचा वापर होईल आणि त्याची विक्री होणार नाही, या अटीवरच ही परवानगी दिली जाईल. संबंधित वस्तूच्या आयातीचा उद्देश साध्या झाल्यानंतर ही वस्तू पुन्हा निर्यात केली जाईल, असेही वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. जगातील इतर देशांसोबतचा भारताचा व्यापारी समतोल ढासळल्याने हा आयात बंदीचा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे. मे आणि जून 2023 या कालावधीत भारताची व्यापारी तूट 20 अब्ज डॉलरहून अधिक आहे. 2022-23 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत, म्हणजेच एप्रिल-जून महिन्यात भारताच्या व्यापारी मालाच्या आयातीत 12.7 टक्क्यांनी घट झाली आहे, त्याच वेळी निर्यात आणखी 15.1 टक्क्यांनी कमी झाली आहे. परदेशातून वस्तूंची खरेदी कमी झाली असली तरी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात एप्रिल-जूनमध्ये वार्षिक 6.3 टक्क्यांनी वाढून 19.76 अब्ज डॉलरवर गेली आहे. पेट्रोलियम उत्पादनांनंतर इलेक्ट्रॉनिक वस्तूची सर्वाधिक आयात भारत करतो. ताज्या आकडेवारीनुसार, भारताकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात एप्रिल-जूनमध्ये 47.1 टक्क्यांनी वाढून 6.96 अब्ज डॉलर झाली आहे, असे ताज्या आकडेवारीतून दिसून आले आहे.

परवाना असलेल्यानांच करता येणार आयात – विदेशी व्यापार महासंचालनालयाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटल्याप्रमाणे एचएसएन 8741 अंतर्गत येणारे लॅपटॉप, टॅब्लेट, ऑल-इन-वन पर्सनल कॉम्प्युटर आणि अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर कॉम्प्युटर आणि सर्व्हरची आयात ‘प्रतिबंधित’ असेल. मर्यादित आयातीचा परवाना असलेल्यांनाच आयातीची अनुमती देण्यात येईल. भारतीय बाजारपेठेत लॅपटॉप विकणार्‍या काही प्रमुख विदेशी कंपन्या आहेत आणि या कंपन्यांच्या उत्पादनांसाठी चीनसारख्या देशांतून मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. या ऐवजी भरतीत बाजारपेठेत स्वदेशी उत्पादनांची निर्मिती व विक्री व्हावी या उद्देशाने आयातीवर निर्बंध लगावण्यात आले आहेत.

COMMENTS