कोपरगाव : मनमाड–सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गावरील कोपरगाव शहरालगत येवला नाका ते बॅक कॉलनी दरम्यान शिरोडे शोरूमसमोरील धोकादायक खड्डा तातडीने बुजविण्यात यावा. तसेच बॅक कॉलनी परिसरात भूमिगत गटाराचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिक येथील प्रकल्प संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.नगराध्यक्ष संधान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर–मनमाड–सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गावरील येवला नाका, शिरोडे शोरूम आणि बॅक कॉलनी परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.विशेषतः शिरोडे शोरूमसमोरील मोठा खड्डा वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याच ठिकाणी यापूर्वी एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला असून त्यानंतरही अनेक लहान-मोठे अपघात घडल्याचे सांगण्यात आले आहे. या मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थी, साईभक्त आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे संधान यांनी म्हटले आहे.साईकुबेर ते एस.एस.जी.एम. महाविद्यालय या मार्गावरील पूर्वीचे पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे गटार बंद झाल्याने नैसर्गिक प्रवाह अडला आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून संबंधित ठिकाणी भूमिगत गटाराचे काम तातडीने हाती घेण्याची मागणीही नगराध्यक्ष संधान यांनी केली आहे.”राष्ट्रीय महामार्गावरील येवला नाका ते बॅक कॉलनी दरम्यान शिरोडे शोरूमसमोरील मोठा खड्डा वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. पावसाळ्यात हा खड्डा पाण्याखाली जात असल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. याच ठिकाणी यापूर्वी एका युवकाचा मृत्यू झाला आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी हा खड्डा तातडीने बुजविणे आणि बॅक कॉलनी परिसरातील भूमिगत गटाराचे काम त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे.” – पराग संधान, नगराध्यक्ष, कोपरगाव नगर परिषद

कोपरगाव : मनमाड–सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गावरील कोपरगाव शहरालगत येवला नाका ते बॅक कॉलनी दरम्यान शिरोडे शोरूमसमोरील धोकादायक खड्डा तातडीने बुजविण्यात यावा. तसेच बॅक कॉलनी परिसरात भूमिगत गटाराचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिक येथील प्रकल्प संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.नगराध्यक्ष संधान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर–मनमाड–सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गावरील येवला नाका, शिरोडे शोरूम आणि बॅक कॉलनी परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.विशेषतः शिरोडे शोरूमसमोरील मोठा खड्डा वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याच ठिकाणी यापूर्वी एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला असून त्यानंतरही अनेक लहान-मोठे अपघात घडल्याचे सांगण्यात आले आहे. या मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थी, साईभक्त आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे संधान यांनी म्हटले आहे.साईकुबेर ते एस.एस.जी.एम. महाविद्यालय या मार्गावरील पूर्वीचे पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे गटार बंद झाल्याने नैसर्गिक प्रवाह अडला आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून संबंधित ठिकाणी भूमिगत गटाराचे काम तातडीने हाती घेण्याची मागणीही नगराध्यक्ष संधान यांनी केली आहे.”राष्ट्रीय महामार्गावरील येवला नाका ते बॅक कॉलनी दरम्यान शिरोडे शोरूमसमोरील मोठा खड्डा वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. पावसाळ्यात हा खड्डा पाण्याखाली जात असल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. याच ठिकाणी यापूर्वी एका युवकाचा मृत्यू झाला आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी हा खड्डा तातडीने बुजविणे आणि बॅक कॉलनी परिसरातील भूमिगत गटाराचे काम त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे.”
– पराग संधान, नगराध्यक्ष, कोपरगाव नगर परिषद

COMMENTS