Homeताज्या बातम्या

नाशिकमध्ये गोदावरी दुथडी भरून वाहिली

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने नाशिक शहर आणि जिल्ह्यात आता जोरदार कमबॅक केले आहे. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण नाशिक

ठाण्यात मुसळधार पावसाने दाणादाण! रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप, ड्रेनेज व्यवस्थेचे उडाले बारा!
राज्यात पावसाचा जोर ओसरला
मावळ तालुक्यात दरड कोसळून तिघांचा मृत्यू23 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश
Godavari River Floods Nashik; Villages Alerted


नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने नाशिक शहर आणि जिल्ह्यात आता जोरदार कमबॅक केले आहे. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण नाशिक शहर जलमय झाले असून, गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला मोठा पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, पुराचे पाणी रामकुंड परिसरातील प्रसिद्ध ’दुतोंड्या मारुती’च्या छातीपर्यंत पोहोचले आहे. रामसेतू पुलालाही पाण्याचा स्पर्श झाला आहे. गोदामाईचे हे रौद्र रूप आणि हंगामातील पहिला पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी नदीकाठी मोठी गर्दी केली आहे.

COMMENTS