Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.माधवराव पाटील जवळगावकर थेट शेतकर्‍यांच्या बांधावर

शेतकर्‍यांच्या जाणून घेतल्या व्यथा !

हदगाव प्रतिनिधी - हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात मागील आठवड्यापासून मोठा पाऊस होत असल्याने अतिवृष्टी झाली आहे. त्यात मतदार संघातील सर्वच श

नवरी पळून गेल्याने नवऱ्याचे आंदोलन
उद्धव ठाकरे यांना नाही कणा ; ॲड. आंबेडकर यांची टीका; सरकार बरखास्तीची मागणी
कोपरगाव तालुक्याला पुरेपूर इंजेक्शनचा साठा मिळावा : विवेक कोल्हे

हदगाव प्रतिनिधी – हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात मागील आठवड्यापासून मोठा पाऊस होत असल्याने अतिवृष्टी झाली आहे. त्यात मतदार संघातील सर्वच शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याने त्यांच्या शेती मध्ये जाऊन शेतकर्‍यांच्या जाणून घेतल्या व्यथा आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी शेतकर्‍यांचे थेट शेती बांध गाठले. प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्हा प्रशासनाने रेड व ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. त्या अनुषंगाने मतदारसंघातील नागरिकांनी दक्ष राहून प्रशासनाच्या सूचना पाळल्या. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. घराची मोठी पडझड झाली. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने आ. जवळगावकर यांनी सर्व परिस्थितीची पाहणी केली.
मौजे चोरंबा येथील अतिवृष्टीने 10 ते 12 नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात मुख्तार शेख फरीद, सुखदेव बोरकर, सटवाजी बोरकर, चंदर वानोळे, रुद्राजी बोडके, शिवाजी बोडके, गंगाबाई वागतकर, सलीम शहा महबूब शहा, अंतिकबाई वागतकर या ग्रामस्थांचे घर पाण्याखाली गेल्याने त्यांचे दैनंदिन व्यवहाराचे सर्वसामान वाहून गेले त्यामुळे त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी आ. माधवराव पाटील जवळगावकर प्रयत्न असल्याची दिसून आले अधिवेशनात सहभागी होत या आठवड्यात दोन वेळेस आ. जवळगावकर यांनी मतदार संघाच्या विविध भागातल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी थेट बांधावर जाऊन केली असून या नुकसानीची भरपाई शेतकरी बांधवांना मिळावी यासाठी विधान भावनात जात आ. जवळगावकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मदतीसाठी सांगडे घातल्याने त्यांच्याकडून प्रधान सचिवाला याबाबतीत अहवाल पाठवण्याच्या सूचनाही केल्या आहेत त्यामुळे मतदार संघात मुस्कान भरपाई मिळण्याची शक्यता या निमित्याने वर्तविल्या  जात आहे.
सत्तेत असो वा नसो, शेतकरी बांधवांना अतिवृष्टी अनुदान मिळून दिले जाईल -आ.जावळगावकर
मागील काही वर्षांपासून शेतकरी बांधवांवर नैसर्गिक आपत्ती येतच आहे. कधी पूर आल्याने तर कधी धरणात पाणी क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे आपण जवळून पाहतच आहोत. त्यामुळे दरवर्षी या ना त्याकारणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना अनुदान मिळावे यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असतो. सत्तेत असो वा नसो मतदारसंघातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी अनुदान मिळवून दिल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे याही अतिवृष्टीत नुकसान झालेल्या सर्वच शेतकर्‍यांना मदत मिळावी यासाठी माझा प्रयत्न असणार असल्याचे आमदार जवळगावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सुट्टीच्या दिवशीही तहसीलदार गुंडमवार कर्तव्यावर हजर
मागील आठवड्यापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात अतिवृष्टी निर्माण झाली. त्या अनुषंगाने नुकसानीची पाहणी करण्यासाठी आ. जवळगावकर हे विविध भागात फिरत आहेत. आ. जवळगावकर यांच्या आदेशान्वये तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी आपली प्रशासन यंत्रणा कामाला लावली असून ते नुकतेच हदगाव तहसील येथे रुजू झाल्यानंतर तालुक्यात नैसर्गिक आपत्तीला त्यांना सामोरे जावे लागले. या सर्व परिस्थितीत तहसीलदार गुंडमवार यांनी तालुक्यातल्या सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. रविवार सुट्टीचा दिवस असतानाही ते कर्तव्यावर हजर होते हे मात्र विशेष.

COMMENTS