महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे संचलित सहकार प्रशिक्षण केंद्र, लातूर, मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अंबाजोगाई आणि कृषी उत्पन्न बाजार स

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे संचलित सहकार प्रशिक्षण केंद्र, लातूर, मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अंबाजोगाई आणि कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिन तसेच सहकार सप्ताह समारोपानिमित्त वृक्षारोपण व राष्ट्रीय सहकार उत्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण विकास, शेतकरी हित आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाईचे सभापती ड. राजेश्वर चव्हाण, तहसीलदार विलास तरंगे, सहाय्यक निबंधक जयंत पाठक, सहकार प्रशिक्षण केंद्र लातूरचे उपप्राचार्य एस. आर. कोळ्ळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, प्रभारी सचिव बी. जी. अदनाक, सहकार अधिकारी एस. के. चव्हाण, पवार तसेच तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सहकार क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व संस्थांच्या प्रतिनिधींनी सहकाराच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

COMMENTS