संप तुटेपर्यंत ताणू नका ; शरद पवारांचे एसटी कर्मचार्‍यांना आवाहन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संप तुटेपर्यंत ताणू नका ; शरद पवारांचे एसटी कर्मचार्‍यांना आवाहन

मुंबई : एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेत यावर तोडगा काढण्या

शिवसेना २ खासदार लढवणार ; ते जिंकुन आणु ही आमची भूमिका l LOKNews24
जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत ध्रुवला सहा पदके
शिवसेनेच्या 16 बंडखोरांना अपात्रतेची नोटीस | DAINIK LOKMNTHAN

मुंबई : एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेत यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. मात्र यावर तोडगा अजूनही निघाला असून, संप तुटेपर्यंत ताणू नका, असे आवाहन शरद पवारांनी एसटी कर्मचार्‍यांना केले. शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केल्यानंतर विलीनीकरण शक्य नसल्याची प्रतिक्रिया ट्विटर, फेसबुक च्या माध्यमातून पोस्ट केली आहे.
परिवहन मंत्र्यांनी मला सांगितले की, एसटी कर्मचार्‍यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्यातील एक मागणी वगळता इतर सर्व प्रश्‍नांवर वाटाघाटी झालेल्या आहेत. मात्र विलीनीकरणाच्या प्रश्‍नावर एकमत झालेले नाही. ज्या संस्थेत आपण कामाला लागलो, त्या संस्थेतून इतर ठिकाणी आपली नोकरी वर्ग करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे. कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सोडवले पाहिजेत, याबद्दल कुणाचेही दुमत नाही. पण विलीनीकरणाचा मुद्दा आज प्रथमदर्शनी तरी योग्य आहे, असे मला वाटत नाही. एसटीचा इतके दिवस संप सुरू आहे. त्यात न्यायालयाचाही निकाल येत आहे. तरीही संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेणे म्हणजे एकप्रकारे कामगारांचे नुकसान करण्याला मदतच करण्यासारखे आहे. म्हणून राज्य सरकार आणि एसटीच्या प्रातिनिधिक आणि अन्य संघटनांनी एकत्र बसून यातून मार्ग काढला पाहिजे. हा संप थांबला पाहिजे. नागरिकांच्या यातना वाढलेल्या आहेत. कार्तिकी एकादशीला शेकडो बस जात असतात. दरम्यान, यासंदर्भात बोलतांना परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले की, निदर्शने करणे प्रत्येकाचा अधिकार आहे पण न्यायालयाच्या समोर आम्ही आत्मदहन करु असे सांगणे हे न्यायालयाला धमकी देण्यासारखे आहे असे मला वाटते. पण धमकी देऊन न्याय मिळत नाही. न्याय न्यायालयीन मार्गाने मागावा. हायकोर्टात आपली बाजू मांडावी आणि न्यायालय जो आदेश देईल त्याचे सर्वांनी पालन केले पाहिजे, असे अनिल परब यांनी म्हटले. दरम्यान, विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेला संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली असून, गेल्या दोन दिवसांत आणखी 125 कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण निलंबित कर्मचार्‍यांची संख्या 2 हजार 178 झाली असून 11 नोव्हेंबपर्यंत एकूण 2 हजार 53 कर्मचारी निलंबित झाले होते. कारवाईच्या धास्तीने कामावर परतणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या वाढू लागली असून त्यामुळे स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील एसटी चालवण्याचे प्रमाण रविवारी वाढले. राज्यात 104 गाडया धावल्याची माहिती महामंडळाने दिली. धावत असलेल्या गाडयांमध्ये रविवारी 60 पैकी 50 मार्गावर शिवशाही, शिवनेरी गाडयाच चालवण्यात आल्या. दरम्यान, विलीनीकरणाच्या मागणीवर काही कर्मचारी ठाम असून संप सुरूच ठेवला आहे.


उच्च न्यायालय योग्य तो निर्णय घेईल : अ‍ॅड. अनिल परब
विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संघटनेच्या नेत्यांनी आता नवीन समिती नेमण्याची मागणी उच्च न्यायालयात केली आहे. सरकारने नेमलेल्या समितीवर विश्‍वास नसल्यामुळे एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत अहवाल देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तीची समिती स्थापन करा अशी मागणी कर्मचारी संघटनेने हायकोर्टात केली आहे. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयासमोर आहे. याबाबत योग्य तो निर्णय उच्च न्यायालय देईल, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे. मी कामगारांना सांगितले आहे की हा प्रश्‍न चर्चा करुनच सुटणार आहे. न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्याचे आम्ही पालन करु. मी कर्मचार्‍यांना अनेक दिवस सांगत आहे की कामावर या आणि आपण चर्चा करु, असे अनिल परब म्हणाले.

COMMENTS