Homeताज्या बातम्या

हप्त्याची मागणी;व्यापार्‍याला मारहाण

अहिल्यानगर : शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील एका कपड्यांच्या दुकानात घुसून ग्राहकाच्या वेशात आलेल्या दोघांनी व्यापार्‍याला मारहाण करत 400 रुपयांची

देवळाली प्रवरेहून पंढरपूरकडे सायकल वारी रवाना २५ सायकलपटूंचा सहभाग; १२ जुलै रोजी पंढरपुरात सायकल संमेलन
जामखेडमचे अडीच कोटींच्या कामांचे भूमिपूजन; नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्रदिनी विकासकामांचा धडाका
नगर अर्बन बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकरपंत गारडे यांचे निधन
Three people were beaten with sticks; Crime against four | marathi news

अहिल्यानगर : शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील एका कपड्यांच्या दुकानात घुसून ग्राहकाच्या वेशात आलेल्या दोघांनी व्यापार्‍याला मारहाण करत 400 रुपयांची पॅन्ट जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना रविवारी (5 जुलै) रात्री घडली. यानंतर संबंधितांनी दुकान चालवायचे असेल तर दररोज 500 रूपयांचा हप्ता द्यावा, अन्यथा अशीच मुले दुकानात पाठवून रोज कपडे घेऊन जाऊ, अशी धमकी दिल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश प्रकाश शिंदे (वय 33, रा. तपोवन रोड) यांनी सोमवारी (6 जुलै) फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन मच्छिंद्र शिंदे (रा. वैदुवाडी, अहिल्यानगर) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS