Homeताज्या बातम्या

श्रीक्षेत्र पैठणच्या पालखी सोबतच्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही – राहुल शेळके

https://youtu.be/trg2fZQNXUc श्रीक्षेत्र पैठणचे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होऊन नगर जिल्ह्यातून जात असल

हज यात्रा 2027 साठी बीड जिल्ह्यातील इच्छुक यात्रेकरूंसाठी अर्ज प्रक्रिया सुरू29 जून ते 20 जुलैपर्यंत करता येणार अर्ज
अयोध्या राम मंदिर देणगीत तब्बल ८० टक्के घट; कथित गैरव्यवहार आणि चोरीच्या आरोपांमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप
 श्रीराम मंदिरातील घटनेची समितीद्वारे चौकशी : गोविंददेवगिरी

श्रीक्षेत्र पैठणचे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होऊन नगर जिल्ह्यातून जात असलेल्या या पालखीबरोबर जाणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही ‘ याबाबत प्रशासनाने दखल घेतली असून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके व शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी या पालखी मार्गाची पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्त करण्याबाबत सूचना दिल्या आहेत ,
पंढरपूर क्षेत्री विठुरायाच्या दर्शनासाठी वैष्णवांचा मेळा दिंड्या ‘ पालख्या घेऊन निघालेला असून श्रीक्षेत्र पैठणचे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांची पालखी देखील पैठण येथून प्रस्थान होऊन अहिल्यानगर जिल्ह्याच्या मुंगी , हातगाव , बोधेगाव , बालमटाकळी ,बाडगव्हाण , लाड जळगाव मार्गे बीड जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याने नगर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय विभागाने पालखी हातगाव येथे मुक्कामाचे ठिकाणची व्यवस्था व वारकऱ्यांना निवासाची ‘ पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही तसेच पालखी रस्त्याची पाहणी करून बालमटाकळी ते बाडगव्हाण खराब रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे ,
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनल शहा विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके , सरपंच डॉक्टर राम बामदळे , सरपंच अंबादास ढाकणे ,यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते .

COMMENTS