Homeताज्या बातम्यासंपादकीय

वाढते प्रदूषण चिंताजनक

देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर देखील प्रदूषणाच्या विळख्यात अलगद ओढले गेले आहे. दिल्लीनंतर सर्वाधिक प्रदूषणाची नोंद मुंबईत करण्यात येत आहे

शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड
इंडिया आघाडीची वाट बिकट
प्रदूषणाचे दिवाळे

देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर देखील प्रदूषणाच्या विळख्यात अलगद ओढले गेले आहे. दिल्लीनंतर सर्वाधिक प्रदूषणाची नोंद मुंबईत करण्यात येत आहे. त्यामुळे वाढते प्रदूषण चिंताजनक आहे. ऐन दिवाळीमध्ये या प्रदूषणाची पातळी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रदूषणाला रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची खरी गरज आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात विविध आजारांनी नागरिक त्रस्त आहे. हिवाळ्यात होणारे बदल नेहमी पोषक असतात. हिवाळ्यात तब्बेत सुधारते असे म्हटले जायचे, मात्र ऐन हिवाळ्यात तापमान बदल आणि प्रदूषणामुळे अनेकांना आजारांचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतांना दिसून येत आहे. मात्र याबरोबर मुंबईच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मुंबईची हवेची गुणवता ही पावसाळ्यात चांगली होती. मात्र, पाऊस जाताच मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा टक्का घसरला आहे. मुंबईहे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून आता ओळखले जाऊ लागले आहे. मुंबईचा वायू गुणवत्ता निर्देशांक 111 एकयूआय नोंदवला गेला. हा दिल्ली पेक्षा 88 एक्युआयने जास्त आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदूषण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. देशातल्या महत्वांच्या शहरांच्या हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास नुकताच करण्यात आला. यात गेल्या चार वर्षात ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांत हवेची गुणवत्ता ही खराब होत असल्याचे पुढे आले आहे. देशात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून राजधानी दिल्लीची ओळख आहे. त्या खालोखाल बंगळुरू, कोलकाता, लखनऊ, पाटणा, मुंबईचा नंबर लागतो. मात्र, मुंबईने आता राजधानी दिल्लीला हवामान प्रदूषणात वाढ झाली आहे. पावसाळ्यात ही प्रमाण कमी होते. मात्र, ऑक्टोबरमध्ये प्रदूषण वाढले आहे. मुंबईने राजधानी दिल्लीला मागे टाकेले आहे. त्यामुळे भविष्यात जर असेच चालू राहिले, तर मुंबई अनेकांना मानवणार नाही. त्यामुळे सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी प्राथमिकेतेने करण्याची गरज आहे. वाढत्या प्रदूषणास बांधकामे कारणीभूत ठरतांना दसिून येत आहे. प्रदूषणमुक्त मुंबईसाठी सरसावलेली मुंबई महापालिका रस्त्यांवर राडारोडा, कचरा फेकणारे अन् बेकायदा बांधकामांचे पेव रोखणे याचे पालिकेसमोर मोठे आव्हान आहेच. त्यात हिवाळ्यात प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने पुन्हा एकदा प्रदूषणाची धास्ती वाढली आहे. त्याचबरोबर समुद्रकिनारी देखील चौपाट्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांवेळी नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूलिकण हवेत पसरतात आणि हवा प्रदूषित होते. त्याचबरोबर मुंबईतील विविध वायू प्रकल्प, रिफायनरी यातूनही वायुप्रदूषण होत आहे. यावर कठोर उपाययोजना करण्याची खरी गरज आहे. मुंबईसारख्या शहरात दररोज येणार्‍या लोंढ्यांची संख्या वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढल्याने वाहनांची गर्दीही तितकीच वाढली आहे आणि हे प्रदूषणाचे एक मोठे कारण आहे. मुंबईत इमारती बांधण्याचे प्रकल्पदेखील वेगाने सुरु आहेत, त्यांच्या बांधकामामुळेही हवेत धूलिकण पसरुन प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. यांवर नियंत्रण आणणे तसेच रासायनिक कंपन्यांमधील प्रदूषण, जैविक कचरा जाळणे, स्मशानभूमीतील धुरामुळे तसेच डम्पिंग ग्राऊंडमुळे होणार्‍या प्रदूषणावर उपाययोजना करणे अत्यावश्यक असतांना, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दवाढत्या प्रदूषणामुळे श्‍वसन आणि त्वचेशी संबंधित आजार वाढत आहेत. श्‍वसन विकारात दमा, क्षयरोग, न्युमोनिया, फुप्फुसे, कर्करोग, श्‍वसननलिकेला सूज, दम लागणे असे विकार, समस्यांचे प्रमाण वाढते आहे. ताप येणे, डोळे दुखणे, घसा दुखणे आदी आजार उद्भवत आहेत. प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात येतांना दिसून येत आहे. वेळीच प्रदूषण रोखणे गरजेचे आहे.

COMMENTS