कोण होणार महापौर?  नगरसेवकांना प्रतीक्षा निवडणूक कार्यक्रमाची

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोण होणार महापौर? नगरसेवकांना प्रतीक्षा निवडणूक कार्यक्रमाची

नगर महापालिकेचा नववा महापौर येत्या 10 दिवसात विराजमान होणार आहे. पण यासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम अजूनही आलेला नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांना आता त्याचीच प्रतीक्षा आहे.

थोरातांच्या घरात गायरान जमिनीची वरात जोरात; कारखानदार वराच्या तर गौणखनिज चोरटे वधूच्या भूमिकेत
माणुसकी आणि कार्यावर ठरते श्रीमंती – पारस महाराज मुथा
आ. जगतापांमुळे येऊ शकते लॉकडाऊनची नामुष्की ; काँग्रेसच्या काळेंनी केला नाव न घेता दावा


अहमदनगर/प्रतिनिधी- नगर महापालिकेचा नववा महापौर येत्या 10 दिवसात विराजमान होणार आहे. पण यासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम अजूनही आलेला नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांना आता त्याचीच प्रतीक्षा आहे. आज-उद्या हा कार्यक्रम नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडून येण्याची दाट शक्यता आहे. तो आल्यानंतर नगरसेवकांना सहलीवर न्यायचे की नाही, याचा निर्णय होणार आहे. दरम्यान, महापौर निवडीची निवडणूक ऑफलाईन होणार की ऑनलाईन याचीही उत्सुकता व्यक्त होत आहे.

    भाजपचे विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांची मुदत येत्या 30 जून रोजी संपणार आहे. त्यानंतर अनुसूचित जातीची महिला या प्रवर्गासाठीची नगरसेविका 1 जुलैपासून महापौरपदी विराजमान होणार आहे. या प्रवर्गाच्या मनपात पाच नगरसेविका असल्या तरी तिघींनी जवळपास माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे व काँग्रेसच्या शीला चव्हाण यांच्यात उमेदवारीची रस्सीखेच आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने त्यात समाविष्ट असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या मित्रपक्षांचीच आघाडी नगर मनपात होते की, स्थानिक राजकारणाचा विचार करून सर्वजण सवतासुभा उभा करतात, हे पाहणे महत्त्वाचे झाले आहे. पण उमेदवारीचा विचार केला तर राष्ट्रवादीकडे रुपाली पारगे या उमेदवार असल्या तरी त्यांचे नाव अजूनपर्यंत त्यांनी चर्चेत आणले नाही. तर सेनेच्या शांता शिंदे व रिता भाकरे यांनी उमेदवारी करण्यास असमर्थता दर्शवल्याने शेवटच्या टप्प्यात शेंडगे व चव्हाण यांच्यात रस्सीखेच आहे. मात्र, त्यांच्यात एकमत झाले नाही तर एकमेकांच्या विरोधात लढत अपेक्षित असून, अशा स्थितीत राष्ट्रवादीच्या 19 व भाजपच्या 15 नगरसेवकांसह बहुजन समाजपक्षाच्या 4 नगरसेवकांना विशेष महत्त्व येणार आहे.

ठाकरेंच्या भेटीला जाणार

शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक रविवारी सायंकाळी येथील यश ग्रँड हॉटेलमध्ये झाली. शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सचिन शिंदे, गणेश कवडे, संतोष गेनप्पा, दत्ता कावरे, योगीराज गाडे, सुभाष लोंढे आदींसह माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, संजय शेंडगे, अनिल बोरुडे, दत्ता जाधव, परेश लोखंड़े व अन्य उपस्थित होते. महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे सर्व 23 नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी मुंबईला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत. शिवसेनेकडून महापौरपदाची निवडणूक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हाती घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म म्हणून राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा की नाही तसेच काँग्रेसच्या उमेदवाराबाबत काय निर्णय घ्यायचा, याबाबत या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांंमध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीला जाणारे शिवसेनेचे नगरसेवक पुढे काही दिवसांसाठी सहलीलाही जाण्याची शक्यता आहे. पण काही नगरसेवकांचा त्याला विरोध आहे. बहुतांश नगरसेवकांचे स्वतःचे व्यवसाय असून कोरोना काळातील निर्बंधांमुळे ते बंद होते व आता अनलॉक झाल्याने व्यवसाय बर्‍यापैकी सुरळीत होत असताना काही दिवसांसाठी जरी म्हटले तरी बाहेरगावी जाण्यास अनेकांची नापसंती आहे. मात्र, पक्षादेश असेल तर जाण्याची तयारीही त्यांची आहे. दरम्यान, भाजपकडे उमेदवार नसल्याने त्यांच्या गोटात शांतता आहे व कोणाकडून काही ऑफर येते काय, याची प्रतीक्षा आहे. तर राष्ट्रवादी व काँग्रेसलाही श्रेष्ठींच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.

काँग्रेसची आशा कायम

काँग्रेसकडे फक्त 5 नगरसेवक असल्याने त्यांना बहुमतासाठी आणखी 29 नगरसेवकांची गरज आहे व राष्ट्रवादीसह बहुजन समाज पक्षाने साथ दिली तर त्यांच्याकडून शिवसेनेसमोर आव्हान उभे राहू शकते. येत्या विधानसभा निवडणुकीत नगरमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातच लढत होणार असल्याचा दावा काँग्रेसच्या गोटातून करण्यात येतो, त्यामुळे आतापासूनच काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र राहावे, अशी अपेक्षा त्यांची आहे. पण नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना व राष्ट्रवादी यापुढे एकत्र लढणार असल्याचे सुतोवाच केले असल्याने काँग्रेसच्या दाव्यातील फोलपणा स्पष्ट होत आहे. त्यामुळेच आता उमेदवारीबाबत काँग्रेसच्या हालचाली उत्सुकतेच्या झाल्या आहेत.

COMMENTS