Homeताज्या बातम्या

35 वर्षांत जे झाले नाही, ते आता बीडकरांना पाहायला मिळत आहे!

बीड नगर पालिकेतील 35 वर्षांची एक हाती सत्ता शहरवासियांनी अनुभवली. कामे कशी झाली ? कधी झाली ? कोणत्या कामासाठी किती खर्च झाला ? कोणत्या गुत्तेदारा

शहरातील ओपन स्पेस व गायरान जमिनींचे तात्काळ नियोजन करानगरसेवक मंगेश धोंगडे यांची आक्रमक मागणी
शेवगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक वाहनाचे लोकार्पण
कर्जत नगरपंचायतच्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी  



बीड नगर पालिकेतील 35 वर्षांची एक हाती सत्ता शहरवासियांनी अनुभवली. कामे कशी झाली ? कधी झाली ? कोणत्या कामासाठी किती खर्च झाला ? कोणत्या गुत्तेदाराने कुठली कामे केली ? याचा थांगपत्ता कोणालाच लागत नव्हता. त्यामुळे कोणत्या रस्त्यावर, कामावर किती निधी खर्च होतोयं ? हे देखील कोणाला समजत नव्हतं. मात्र स्व.अजितदादांचा विकासाचा संकल्प, आ.विजयसिंह पंडित यांचे नेतृत्व आणि ‘मुजीब पर्व’ च्या माध्यमातून मतदारांचे आशिर्वाद, दुवाँ यामुळे नगर पालिकेत सत्ता परिवर्तन झाले. बीड शहराच्या सर्वांगिण विकासाचा संकल्प करणारे हे सत्ता परिवर्तन आता विकासाच्या दिशेने झेप घेऊ लागले आहे. 35 वर्षात जे झाले नाही ते आता बीडकरांना पहायला मिळत आहे. पुर्वी सारखे कोणतेही काम लपुन-छपून नाही तर त्या कामाच्या सर्व माहिती फलक लावून डंके की चोट पे विकास कामे केली जाऊ लागली आहेत. याचं प्रत्यक्ष उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतिर्थ) ते नगर परिषद पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम, राजुरी वेस ते माळीवेस पोलीस चौकी कॉर्नरपर्यंतच्या कामातून अख्ख्या बीडकरांना पहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी भले मोठे बॅनर लावून कामाचे नांव, कोणत्या लेखाशिर्षमधुन काम होत आहे, त्याची किंमत, कामाची मुदत, कंत्राटदाराचे नांव एवढचं काय खोदकाम किती करायचयं, खडीकरण कुठपर्यंत राहिल, काँक्रिट किती इंच टाकायचे, रस्ता कटींग कुठपर्यंत करायचा, डांबर कुठपर्यंत भरायचे, नाली खोदकामाची लांबी-रूंदी, रोड सोलिंग कशी करायची, नालीची भिंत, स्लॅब कुठून कुठपर्यंत टाकायचा, रिफ्लेक्टर किती लावायचे आणि रोड मार्किंग पेंटची लांबी-रूंदी कशी राहिल. ही सर्व माहिती या बॅनरवर लिहीण्यात आली आहे. या बोर्डकडे पाहिल्यानंतर अख्ख्या कामाचे स्वरूप आणि रूप नक्कीच प्रत्येकाच्या लक्षात येईल अशा प्रकारचा उल्लेख त्यावर करण्यात आलेला आहे. कोणतेही काम किंवा अंर्तगत बाबी नागरीकांपासून लपवुन ठेवण्यात आलेल्या नाहीत. जे आहे ते डंके की चोट पे आणि सर्वांसाठी खुले आहे. दरम्यान आत्तापर्यंत कामाची माहिती दर्शविणारे बॅनर कामाच्या ठिकाणी कधीच लागले नव्हते. मात्र जे 35 वर्षात झालं नाही ते आता जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार, आ.विजयसिंह पंडित, माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली आणि नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब यांच्यासह सर्व सभापती, नगरसेवक यांच्या सत्ताकाळात बीडकरांना पहायला आणि अनुभवायला मिळत आहे.

COMMENTS